पाकिस्तानच्या संघाला मिळाला भारताचा व्हिसा; 'या' दिवशी रंगणार महासंग्राम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 09:01 AM2023-06-20T09:01:58+5:302023-06-20T09:03:51+5:30

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय वातावरण अद्यापही तणावपूर्ण आहे

IND vs PAK Pakistan team gets visa for India The match will be played on 17 September | पाकिस्तानच्या संघाला मिळाला भारताचा व्हिसा; 'या' दिवशी रंगणार महासंग्राम

पाकिस्तानच्या संघाला मिळाला भारताचा व्हिसा; 'या' दिवशी रंगणार महासंग्राम

googlenewsNext

India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळांमध्ये सुरू असलेल्या मोठ्या वादानंतर अखेर हायब्रीड मॉडेलमध्ये आशिया चषक खेळवला जाणार आहे. दोन्ही मंडळांनी ते मान्य केले आहे. या अंतर्गत 4 सामने पाकिस्तानमध्ये तर उर्वरित 9 सामने श्रीलंकेत खेळवले जातील. भारत आपले सर्व सामने फक्त श्रीलंकेत खेळणार आहे. या दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या एका टीमला भारतात येण्यासाठी व्हिसा मिळाला आहे.

PAK टीमला व्हिसा मिळाला!

दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन (SAFF) चॅम्पियनशिप 21 जूनपासून भारतात सुरू होत आहे. यासाठी पाकिस्तान संघाला भारतात येण्यासाठी व्हिसा मिळाला आहे. भारत या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. १७ सप्टेंबरला भारत-पाक सामना खेळला जाणार आहे. भारतासोबतच पाकिस्तान, कुवेत आणि नेपाळचा संघ अ गटात ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर बांगलादेश, लेबनॉन, भूतान आणि मालदीव संघांचा ब गटात समावेश आहे. भारतात होणारे सर्व सामने बेंगळुरू येथील श्री कांतीरवा स्टेडियमवर खेळवले जातील. 

व्हिसा मिळण्यास विलंब

पाकिस्तानचा संघ रविवारीच भारतात येणार होता पण व्हिसा मिळण्यास उशीर झाल्यामुळे टीमला येण्यास उशीर झाला. सोमवारी संध्याकाळी पाकिस्तान संघाला व्हिसा देण्यात आला. पाकिस्तान संघ मॉरिशसमध्ये आहे, तेथून ते बंगळुरूला रवाना होणार होणार होते, परंतु व्हिसाला उशीर झाल्यामुळे ते येऊ शकले नाही. जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचा संघ मंगळवारी सकाळपर्यंत भारतात पोहोचेल.

या दिवशी भारत-पाक सामना होणार

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन (SAFF) चॅम्पियनशिपचा सामना 21 जून रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. सायंकाळी 7.30 पासून श्री कांतीरवा स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. या स्पर्धेतील अनेक सामनेही दुपारी साडेतीन वाजल्यापासून होणार आहेत. प्रत्येक गटातील संघ एकमेकांशी एक एक सामना खेळतील, तर या साखळी टप्प्यातील सामन्यांनंतर प्रथम आणि द्वितीय क्रमांकावर असलेले संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्याचवेळी, अ गटातील क्रमांक-1 संघाचा उपांत्य फेरीत गट ब मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी, तर ब गटातील क्रमांक-1 संघाचा सामना अ गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी होईल. यानंतर, दोन विजेत्या संघांमध्ये विजेतेपदाचा सामना खेळला जाईल, जो 4 जुलै रोजी होणार आहे.

Web Title: IND vs PAK Pakistan team gets visa for India The match will be played on 17 September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.