खऱ्याअर्थाने विजय कबड्डीचाच!
By Admin | Published: August 23, 2015 02:08 AM2015-08-23T02:08:56+5:302015-08-23T02:08:56+5:30
पहिल्या पर्वात अग्निपरीक्षा पुरेशी नव्हती तर दुसऱ्या पर्वात खरी अग्निपरीक्षा पुढे होती. निकालही शानदार. भारताच्या या प्राचीन खेळाच्या यशस्वी आयोजनाचा उत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे.
- चारु शर्मा...
पहिल्या पर्वात अग्निपरीक्षा पुरेशी नव्हती तर दुसऱ्या पर्वात खरी अग्निपरीक्षा पुढे होती. निकालही शानदार. भारताच्या या प्राचीन खेळाच्या यशस्वी आयोजनाचा उत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे. प्रो-कबड्डी लीग लोकांच्या मनापासून पचनी पडत आहे.
देशभरातून आलेल्या प्रतिक्रियांमधून हे स्पष्ट होऊ लागले. भारतीयांना या खेळाचे नवे रूप पचनी पडले. शहरातील युवावर्ग उत्तर रात्री घरी परतण्याचे विसरून गेला. महिलादेखील कबड्डी नाईटचा आनंद लुटत आहेत.
आपल्याकडे या खेळाशी संबंधित काही ना काही प्रतिक्रिया असतील, अशी मला आशा आहे. आमच्यासोबत आपल्या आठवणी शेअर करा. प्रेक्षकांनी खच्चून भरलेले स्टेडियम आणि शानदार रेटिंग नजरेपुढे आहेच. स्टार स्पोर्टस्ने आपल्या प्रमोशन्सद्वारे पुन्हा एकदा अपेक्षा वाढविल्या. विशेषत: स्पर्धेचे प्रॉडक्शन अप्रतिम आणि स्टेडियममधील अनुभव देखील हाय व्होल्टेजच! टीव्हीवरील शानदार अॅक्शन, समर्पित समालोचक, ग्राफिक्स, साऊंड या सर्वांचे एकत्रितपणे आकर्षक ‘कॉकटेल’ बनले. मग उणीव कुठे आहे? माझ्यामते काहीही उणीव नाही!
यशस्वी प्रॉडक्टसोबत कोण जुळणार नाही. खरेतर आम्ही सर्वजण या प्लॅटफॉर्मवर आनंदी आहोत. स्टार स्पोर्टस्ने या भारतीय खेळाला जे रूप दिले त्यामुळे आमचे सर्वांचे उद्दिष्ट सफल होऊ शकले याचा आनंद मोठा आहे. स्टार स्पोर्टस् या वाहिनीने मातीतला खेळ नव्या रूपात जगापुढे ठेवला. याचा मोठा लाभ खेळाडूंना झाला. खरेतर खेळाडू या लाभाचे हकदार आहेतच. परिश्रम करणाऱ्या नम्र आणि मानसिक कणखरता जोपासणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळत आहे. आज जे स्टारडम त्यांना लाभले ते त्यांच्या मेहनतीचे ‘रिटर्न ’ आहे. बक्षिसांची रक्कम देखील मागच्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट होऊन दोन कोटीवर पोहोचली.विजेता संघ एक कोटी रुपये घेऊन जाईल. फायनलमध्ये दाखल होणाऱ्या संघाला ५० लाख मिळतील. तिसऱ्या स्थानावरील संघाला ३० लाख तसेच चौथ्या स्थानावरील संघाला २० लाख रुपयांचा लाभ होईल. स्पर्धेतील मोस्ट ‘व्हॅल्युएबल प्लेयर’ला महिंद्रा कार मिळेल.
स्टार स्पोर्टस् प्रो-कबड्डीच्या या पर्वाने अनेक युवा आणि भविष्यातील स्टार खेळाडूंना पुढे आणले आहे. यामुळे हजारो युवा खेळाडू प्रेरणा घेतील. पटना पायरेट्स आणि तेलगू
टायटन्स यांच्यात तिसऱ्या स्थानासाठी लढत झाली. रविवारी यू मुंबाविरुद्ध बेंगळुरु बुल्स असा अंतिम
सामना रंगणार आहे. माझ्यामते मात्र या खेळाचा आधीच विजय झाला. आपण सर्वजण कबड्डीच्या या आंदोलनात सहभागी झालात याबद्दल मनापासून धन्यवाद ! (टीसीएम)