इंदरजित ११व्या, तर बालजिंदर १२व्या स्थानी

By admin | Published: August 23, 2015 11:44 PM2015-08-23T23:44:15+5:302015-08-23T23:44:15+5:30

भारताच्या इंदरजित सिंहने पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात अंतिम फेरीत ११ व्या कर बालजिंदर सिंह पुरुषांच्या २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत

Inderjit was 11th and Baljinder was 12th | इंदरजित ११व्या, तर बालजिंदर १२व्या स्थानी

इंदरजित ११व्या, तर बालजिंदर १२व्या स्थानी

Next

बीजिंग : भारताच्या इंदरजित सिंहने पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात अंतिम फेरीत ११ व्या कर बालजिंदर सिंह पुरुषांच्या २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत १२ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
बर्डनेस्ट स्टेडियमच्या ट्रॅकवर सुरू असलेल्या या स्पर्धेत इंदरजित सिंहने पात्रता फेरीत २०.४७ मीटर गोळा फेकून अंतिम फेरी गाढली होती. अंतिम फेरीत त्याला ११ व्या क्रमांकावर राहावे लागले. अंतिम फेरीच्या पहिल्या संधीला इंदरजितने १९.५२ मीटर गोळा टाकला. त्याचा दुसरी फेकी फाऊल झाली. तिसऱ्या संधीत त्याने १८.६८ मी. चर कामगिरी केली. पुरुषांच्या २० कि.मी. चालण्याच्या शर्यतीत बालजिंदरने रविवारी ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या ५१ स्पर्धकांमध्ये १२ वा क्रमांक संपादन करताना १ तास २१ मिनिटे ४४ सेकंदांची वेळ नोंदविली. ही त्याची आतापर्यंतची सर्वश्रेष्ठ वेळ आहे. याव्यतिरिक्त भारताचे गुरमित सिंह (१ तास २५ मि. २२ से.) आणि चंदन सिंह (१ तास २६ मि. ४० से.) अनुक्रमे ३६ व ४२ व्या क्रमांकावर राहिले.(वृत्तसंस्था)

Web Title: Inderjit was 11th and Baljinder was 12th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.