Big Blow : हिमा दासचे टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा खेळण्याचे स्वप्न तुटले; भारताच्या 4 बाय 400 मीटर महिला रिले संघाला अपयश 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 10:03 AM2021-06-30T10:03:37+5:302021-06-30T10:04:07+5:30

Tokyo Olympics 2020 : भारताच्या 4 बाय 400 मीटर रिले महिला संघाला टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता मिळवण्यात अपयश आले.

India 4x400 meter women relay team failed to qualify for tokyo olympics,  Hima Das Couldn't qualify  | Big Blow : हिमा दासचे टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा खेळण्याचे स्वप्न तुटले; भारताच्या 4 बाय 400 मीटर महिला रिले संघाला अपयश 

Big Blow : हिमा दासचे टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा खेळण्याचे स्वप्न तुटले; भारताच्या 4 बाय 400 मीटर महिला रिले संघाला अपयश 

googlenewsNext

Tokyo Olympics 2020 : भारताच्या 4 बाय 400 मीटर रिले महिला संघाला टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता मिळवण्यात अपयश आले. बहामा संघानं भारतीय महिला रिले संघाचे हे स्वप्न धुळीस मिळवले. बहामाच्या महिला रिले संघानं ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत 3 मिनिटे 29.40 सेकंदाची वेळ नोंदवली अन् भारतीय संघापेक्षा ही वेळ 0.02 सेकंद जलद ठरली. ( Bahamas pushed Indian women 4x400m relay team out of Tokyo 2020 with a performance of 3:29.40s, 0.02 faster than Indian performance). हा भारतासाठीच नव्हे तर सुवर्णकन्या हिमा दास ( Hima Das) हिच्यासाठी मोठा झटका आहे. आता हिमाला कोणत्याच क्रीडा प्रकारातून टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत खेळता येणार नाही.

अर्चना सुसींद्रन, हिमा दास, एस धनलक्ष्मी आणि द्युती चंद या महिलांच्या 4 बाय 400 मीटर रिले टीमला क्वालिफायसाठीचे प्रबळ दावेदार मानले जात होते. संघाला थेट प्रवेश न मिळाल्यास रोड टू टोक्यो रँकिंगनुसार त्यांना ऑलिम्पिकचे तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती. पण, आता तेही शक्य नाही.  


हिमा दासचे टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतून बाहेर जाणे निश्चित आहे. शनिवारी 100 मीटर हिट शर्यतीत तिला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली. हिमानं सोमवारी 200 मीटर फायनल स्पर्धेत सहभाग घेऊन ऑलिम्पिक तिकीट पटकावण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

ऑलिम्पिक पात्रतेच्या अखेरच्या इव्हेंटमध्ये भारताची थाळीफेकपटू सीमा पूनियानं टोक्योचं तिकीट पटकावलं. तिनं राष्ट्रीय आंतर राज्य स्पर्धेत 63.72 मीटर लांब थाळी फेक करून सुवर्णपदक जिंकले. 37 वर्षीय पूनियानं 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य आणि 2018च्या आशियाई स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.  


 

Web Title: India 4x400 meter women relay team failed to qualify for tokyo olympics,  Hima Das Couldn't qualify 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.