ISSF World Cup: अभिषेक वर्माचा 'सुवर्ण'वेध अन् ऑलिम्पिक प्रवेश...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 01:02 PM2019-04-27T13:02:18+5:302019-04-27T13:03:28+5:30
भारताच्या अभिषेक वर्माने नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.
बीजिंग : भारताच्या अभिषेक वर्माने नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने या सुवर्णपदकासह 2020च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता निश्चित केली. भारताकडून ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवणारा तो पाचवा नेमबाज ठरला आहे. याआधी अभिषेकने 2018च्या आशिया स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते, 2019च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे.
A thrilled Abhishek Verma on top of the podium showing off his 10m Air Pistol gold medal @issf_shooting World Cup in Beijing. He also won India’s fifth @tokyo2020 quota in shooting in the process. pic.twitter.com/ec3pWaXVGz
— NRAI (@OfficialNRAI) April 27, 2019
याआधी अंजुम मुदगील, अपूर्वी चंडेला ( 10 मीटर एअर रायफल), सौरभ चौधरी आणि दिव्यांश सिंग पानवर यांनी ऑलिम्पिक पात्रता निश्चित केली होती.
India’s newest young #ShootingStar Divyansh Singh Panwar proudly showing off his silver medal at the @ISSF_Shooting World Cup in #beijing. The teenager had a sensational run to bag a @Tokyo2020 Olympic quota for #india as well in the men’s 10m Air Rifle pic.twitter.com/TMbjUUNYuL
— NRAI (@OfficialNRAI) April 26, 2019
अभिषेकने 10 मीटर एअर पिस्तुल प्रकाराच्या अंतिम फेरीत 242.7 गुणांची कमाई करताना सुवर्णपदकावर नाव कोरलं, रुसच्या अर्तेम चेरनोसोव्हने 240.4 आणि कोरियाच्या हान सेवूंगोने 220.0 गुणांसह अनुक्रमै रौप्य व कांस्यपदक जिंकले.