ठोशांच्या लढाईत भारताचा चीनवर दणदणीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2017 09:40 PM2017-08-05T21:40:16+5:302017-08-05T22:43:19+5:30

विजेंदर सिंग आणि  चीनचा अव्वल बॉक्सर जुल्फिकर मैमतअली यांच्यात शनिवारी झालेल्या  रंगतदार सामन्यात विजेंदर सिंगने विजय मिळवला.

India and China start the battle of the choke | ठोशांच्या लढाईत भारताचा चीनवर दणदणीत विजय

ठोशांच्या लढाईत भारताचा चीनवर दणदणीत विजय

Next

 मुंबई, दि. 5 - वरळीच्या एनएससीआय स्टेडियममध्ये भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंग आणि  चीनचा अव्वल बॉक्सर जुल्फिकर मैमतअली यांच्यात शनिवारी झालेल्या  रंगतदार सामन्यात विजेंदरने सिंगने विजय मिळवला. व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये उतरल्यापासून विजेंदरचा हा सलग नववा विजय आहे. या विजयासह विजेंदरने मैमतअलीकडून डब्ल्यूबीओ ओरिएंटल सुपर मिडलवेटचे जेतेपद हिसकावले तसेच विजेंदरने स्वत:च्या डब्ल्यूबीओ एशिया पॅसिफिक मिडलवेट विजेतेपदाचा यशस्वी बचाव केला. 

या सामन्यात विजेंदरने उत्कृष्ट बचावतंत्र दाखवत प्रतिस्पर्ध्याला अचूक आणि जोरदार ठोसे लगावले. पहिल्या फेरीत दोन्ही खेळाडूंनी सावध पवित्रा घेत एकमेकांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. अतिआक्रमकता दाखवणा-या मैमतअलीला पंचांनी सामना सुरु असताना अनेकदा वॉर्निंगही दिली. सातव्या फेरीपासून दोन्ही बॉक्सर्सच्या चेह-यावर थकवा दिसायला लागला. आठव्या-नवव्या फेरीत विजेंदर थकला होता तरीही त्याने सामना सोडला नाही. त्याने अचूक जोरदार ठोसे लगावले. एकाक्षणी बॅलन्स जाऊन विजेंदर खाली सुद्धा कोसळला. 

या सामन्याला सध्या भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या तणावाची किनार असल्याने स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी चीन विरोधी घोषणाबाजीही केली. प्रेक्षकांनी मैमतअलीला डिवचलेही. मैमतअलीविरोधात चिटर चिटर अशी घोषणाबाजीही झाली. अखेर दहाव्या फेरीअखेर पंचांनी सामना थांबवला त्यानंतर सर्वांचे लक्ष पंचांच्या निकालाकडे लागले होते. पंचांनी विजेंदरच्या विजयाची घोषणा करताच स्टेडियममधल्या उपस्थित प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. 

व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये पदार्पण केल्यापासून सलग आठ लढती जिंकलेला भारताच्या स्टार बॉक्सर विजेंदर सिंग रविवारी सलग नववी लढत जिंकण्याच्या निर्धाराने मुंबईत रिंगमध्ये उतरला होता. 

खेळ सर्वांना एकत्रित आणतो आणि तेच काम मी करणार आहे. सध्या भारत आणि चीन यांच्यामध्ये बॉर्डरवर गंभीर वातावरण आहे. परंतु, हा खेळ आहे. जुल्फिकरविरुद्धची लढत भारत विरुध्द चीन अशीच आहे. मी देशासाठी लढणार असून रिंगमध्ये नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास भारताचा स्टार व्यावसायिक बॉक्सर विजेंदर सिंगने व्यक्त केला होता. दरम्यान रविवारी मुंबईत एकूण सात लढती झाल्या. व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये पदार्पण करणा-या  ऑलिम्पियन अखिल कुमारने ऑस्ट्रेलियाच्या टाय गिलख्रिस्टविरूध्द एकतर्फी विजय मिळवला. 

Web Title: India and China start the battle of the choke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.