भारत-अर्जेंटिना लढत बरोबरीत

By admin | Published: August 13, 2014 02:33 AM2014-08-13T02:33:56+5:302014-08-13T02:33:56+5:30

आॅलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय पुरुष संघ आणि अर्जेंटिना यांच्यातील नवव्या फेरीतील लढत बरोबरीत सुटली़ मात्र, भारतीय महिला संघाला युक्रेनकडून पराभवाचे तोंड पाहावे लागले़

India-Argentina match | भारत-अर्जेंटिना लढत बरोबरीत

भारत-अर्जेंटिना लढत बरोबरीत

Next

ट्रोम्सो : आॅलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय पुरुष संघ आणि अर्जेंटिना यांच्यातील नवव्या फेरीतील लढत बरोबरीत सुटली़ मात्र, भारतीय महिला संघाला युक्रेनकडून पराभवाचे तोंड पाहावे लागले़
या स्पर्धेत पुरुष गटात भारताच्या पी़ सेतुरमन सँड्रो मारेकोविरुद्ध खेळताना विजय मिळवेल, असे वाटत होते़ मात्र, अखेर त्याला ड्रॉवर समाधान मानावे लागले़ परिमार्जन नेगी याची फ र्नांडो पेराल्टाविरुद्धची लढत बरोबरीत राहिली़ तसेच कृष्णन शशिकिरण याला रुबेन फेलगर आणि बी़ अधिबानला डियगो फ्लारेसविरुद्ध बरोबरीची नामुष्की ओढावली़
अर्जेंटिनाविरुद्ध भारताला ड्रॉवर सामाधान मानावे लागले असले तरी गुण तालिकेवर जास्त परिणाम झालेला नाही़ स्पर्धेच्या अद्याप दोन फेऱ्या शिल्लक आहे़ सध्या भारताच्या खात्यात १३ गुण आहेत़ हा संघ अव्वल क्रमांकावर असणाऱ्या चीन आणि फ्रान्सपेक्षा दोन गुणांनी मागे आहे़ दहाव्या फेरीत चीन आणि फ्रान्स आमने सामने येणार आहेत़ (वृत्तसंस्था)

Web Title: India-Argentina match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.