भालाफेकपटू नीरजसाठी भारताने मागितले 'वाईल्ड कार्ड'
By admin | Published: July 28, 2016 07:01 PM2016-07-28T19:01:49+5:302016-07-28T19:01:49+5:30
२० वर्षांखालील गटाचा विश्वविजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याला टवाईल्ड कार्डटद्वारे रिओ आॅलिम्पिकमध्ये थेट प्रवेश देण्याची मागणी एएफआय आयएएएफ केली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ : २० वर्षांखालील गटाचा विश्वविजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याला टवाईल्ड कार्डटद्वारे रिओ आॅलिम्पिकमध्ये थेट प्रवेश देण्याची मागणी भारतीय अॅथ्लेटिक्स महासंघाने (एएफआय)आंतरराष्ट्रीय अॅथ्लेटिक्स
महासंघाकडे(आयएएएफ) केली आहे. एएफआयने यासंदर्भात आंतरराष्ट्रीय संघटनेचे प्रमुख सॅबेस्टियन को यांना
पत्र लिहिले आहे. त्यात नीरजला रिओमध्ये ५आॅगस्टपासून सुरू होत असलेल्या आॅलिम्पिकमध्ये भालाफेकीत वाईल्ड कार्डने थेट प्रवेश देण्याची मागणी केली.
हरियाणाचा १८ वर्षांचा नीरज याने पोलंडमध्ये २० वर्षांखालील विश्व चॅम्पियनशिपमध्ये ८६.४८ मीटर भालाफेक करीत विश्व विक्रमाची नोंद केली होती. लॅटेव्हियाचा जिगिरमंड सिरमायस याचा ८४.६९ मीटरचा विक्रम नीरजने मोडित काढला. नीरजचा क्रीडामंत्री विजय गोयल यांनी कालच सन्मान केला.
त्याला क्रीडा मंत्रालयाकडून दहा लाखांची रोख रक्कमदेखील भेट दिली. रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता सिद्ध करण्याची अखेरची तारीख ११ जुलै होती. नीरज निर्धारित वेळेत पात्रता गाठू शकला नव्हता. आॅलिम्पिक भालाफेकीत पात्रता अंतर ८३ मीटर असे होते. नीरजचे वय फारच कमी असल्याने आणि सध्या तो सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्यामुळे रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकू
शकतो, या भावनेतून भारतीय अॅथ्लेटिक्स महासंघाने त्याच्यासाठी वाईल्ड कार्डची मागणी पुढे रेटली.
एएफआयचे अध्यक्ष तसेच आंतरराष्ट्रीय महासंघाचे सदस्य आदील सुमारीवाला यांनीदेखील विश्व संस्थेने मनावर घेतल्यास नीरजला रिओसाठी वाईल्ड कार्ड मिळण्यास अडचण जाणार नसल्याचे सांगितले. आॅलिम्पिकमध्ये जगातील
सर्वोत्कृष्ट खेळाडू स्वत:ला पारखतात. नीरजने अलीकडच्या कामगिरीवरून स्वत:ची प्रतिभा सिद्ध केली आहे. भारताच्या या खेळाडूला विश्व संस्थेने वाईल्ड कार्ड द्यावे, असे भारतीय अॅथ्लेटिक्स संघटनेने पत्रात आवाहन केले.