भारत-ऑस्ट्रेलिया लढत ड्रॉ
By admin | Published: November 26, 2014 01:26 AM2014-11-26T01:26:19+5:302014-11-26T01:26:19+5:30
भारताने क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्धचा दोन दिवसीय सराव सामना बरोबरीत सोडविला़ त्याचबरोबर भारतीय खेळाडूंनी आम्ही कसोटी मालिकेसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले आह़े
Next
अॅडलेड : मुरली विजय (51), चेतेश्वर पुजारा (55), विराट कोहली (6क्), रिद्धिमान साहा (नाबाद 56), कर्ण शर्मा (नाबाद 52) यांच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर भारताने क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्धचा दोन दिवसीय सराव सामना बरोबरीत सोडविला़ त्याचबरोबर भारतीय खेळाडूंनी आम्ही कसोटी मालिकेसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले आह़े
भारतीय गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश संघ पहिल्या दिवशी आपल्या पहिल्या डावात सर्व बाद 219 धावांर्पयत मजल मारू शकला होता़ प्रत्युत्तरात भारताने सामन्याच्या दुस:या आणि अखेरच्या दिवशी आपल्या पहिल्या डावात दिवसअखेर 91 षटकांत 8 बाद 363 धावा केल्या़
सकाळी भारतीय संघाने 1 बाद 55 या धावसंख्येपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली़ तेव्हा मुरली विजय 32 आणि चेतेश्वर पुजारा 13 धावांवर खेळत होत़े मुरलीने रिटायर्ड आउट होण्यापूर्वी 82 चेंडूंत 8 चौकारांसह 51 धावांची खेळी केली, तर पुजाराने रिटायर्ड आउट होण्यापूर्वी 8क् चेंडूंत 11 चौकारांसह 55 धावांची शानदार
खेळी केली़ (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक :
क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश : पहिला डाव : 71़5 षटकांत सर्व बाद 219़ भारत : पहिला डाव : 91 षटकांत 8 बाद 363़ (मुरली विजय (रिटायर्ड आउट) 51, चेतेश्वर पुजारा 55, विराट कोहली 6क्, सुरेश रैना 44, रिद्धिमान साहा नाबाद 56, कर्ण शर्मा नाबाद 52़ रोहित शर्मा 23़ जोश लालोर 2/55, मॅथ्यू शॉर्ट 2/6क्,पॅटिन्सन 1/24, सॅम ग्रिमवाडे 1/61)़