भारत-आॅस्ट्रेलिया कसोटी वाद

By admin | Published: March 8, 2017 01:29 AM2017-03-08T01:29:55+5:302017-03-08T01:30:43+5:30

भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या क्रिकेट मालिकेत वादग्रस्त प्रसंग येणारच हे जगजाहीर आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने मंगळवारी आॅस्ट्रेलियन कर्णधार

India-Australia Test debate | भारत-आॅस्ट्रेलिया कसोटी वाद

भारत-आॅस्ट्रेलिया कसोटी वाद

Next

बंगळुरू : भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या क्रिकेट मालिकेत वादग्रस्त प्रसंग येणारच हे जगजाहीर आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने मंगळवारी आॅस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथवर डीआरएसचा वापर करताना एकप्रकारे चुकीचा आधार घेत असल्याचा आरोप करीत मोठा वाद निर्माण केला. त्यामुळे उभय संघांदरम्यान तणाव वाढला.
भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात ७५ धावांनी विजय मिळवल्यानंतर प्रतिक्रिया देताना कोहली म्हणाला, ‘आम्ही डीआरएसचा सातत्याने योग्य वापर करू शकलो नाही, पण आम्ही निर्णय मैदानावरच घेतो. त्यासाठी ड्रेसिंग रूमचा आधार घेत नाही. मी फलंदाजी करीत असताना दोनदा बघितले. त्यांचे खेळाडू वर ड्रेसिंग रूमकडे बघत होते. मी पंचांना त्याची कल्पना दिली. हे थांबवायला हवे, असेही त्यांना सांगितले.’
आॅस्ट्रेलियाच्या डावातील २१व्या षटकात ज्यावेळी स्मिथला वेगवान गोलंदाज उमेश यादवने पायचित केले त्यावेळी पाहुण्या संघाचे खेळाडू डीआरएस घेण्याबाबत साशंक होते. स्मिथ सुरुवातीला नॉन स्ट्रायकर एंडला असणाऱ्या सहकाऱ्यासोबत चर्चा करण्यासाठी गेला. त्यानंतर ड्रेसिंग रूमच्या दिशेने बघायला लागल्यामुळे पंचांनी ताबडतोब स्मिथला थांबविण्याचा प्रयत्न केला. कोहली यात सहभागी झाल्यामुळे वादात आणखी भर पडली.’

कोहली व स्मिथ दरम्यान ‘तू.. तू.. मै.. मै’..
भारतीय कर्णधार विराट कोहली आणि आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांच्यादरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान मंगळवारी पुन्हा वाद झाला. पाहुण्या संघाच्या कर्णधाराने बाद झाल्यानंतर डीआरएससाठी ड्रेसिंग रूमकडून संकेत मागितल्याने हा वाद झाला.
आॅस्ट्रेलियाच्या डावातील २१व्या षटकात स्मिथला भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने पायचित केले. त्यावेळी पाहुणा संघाने या निर्णयाविरुद्ध डीआरएसची मागणी करायची किंवा नाही, याबाबत साशंकता होती. कारण सुरुवातीला डेव्हिड वॉर्नरच्या निर्णयाविरुद्ध डीआरएसचा वापर करण्यात आला होता. तो निर्णय भारताच्या बाजूने लागला होता. 
स्मिथ सुरुवातीला चर्चा करण्यासाठी नॉन-स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या सहकाऱ्याकडे गेला. पण, फलंदाज ड्रेसिंग रूमकडे बघत असल्याचे पंचांच्या निदर्शनास आले. पंचांनी स्मिथला थांबविण्याचा प्रयत्न केला.

Web Title: India-Australia Test debate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.