भारत बॅकफूटवर

By admin | Published: July 20, 2014 01:00 AM2014-07-20T01:00:44+5:302014-07-20T01:00:44+5:30

प्रत्येक सत्रत वेगळेच रुप दाखविणा:या लॉर्डस कसोटीत दुस:या डावात फलंदाजी करणा:या धोनी ब्रिगेला ‘इंच इंच भूमी लढवू’ असे म्हणत धावांसाठी धावाधाव करावी लागत आहे.

India back to foot | भारत बॅकफूटवर

भारत बॅकफूटवर

Next
लंडन : प्रत्येक सत्रत वेगळेच रुप दाखविणा:या लॉर्डस कसोटीत दुस:या डावात फलंदाजी करणा:या धोनी ब्रिगेला ‘इंच इंच भूमी लढवू’ असे म्हणत धावांसाठी धावाधाव करावी लागत आहे. पुजारा आणि विजय यांच्या संयमी भागीदारी नंतर भारताच्या तीन विकेट धडाधड पडल्या आणि दिवसअखेरीस भारतीय गोटात चिंतेची छाया पसरली होती. तिस:या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 4 बाद 169 अशा धावा केल्या होत्या. पाहुण्या संघाकडे आता 145 धावांची आघाडी असून त्यांचे 6 गडी बाद व्हायचे आहेत. मुरली विजय 59 तर कर्णधार महेंद्रसिंग धोनी 12 धावा करुन खेळपट्टीवर नाबाद आहेत. 
भुवनेश्वरकुमारच्या बळींच्या ‘षटकारा’मुळे इंग्लंड संघाला 319 या मर्यादित धावसंख्येवर रोखता आल्यामुळे काहीशा उत्साहीत भारतीय संघाला या डावातही मोठी सलामी मिळू शकली नाही. इंग्लंडचे गोलंदाज टिच्चून गोलंदाजी करीत असताना शिखर धवन स्वत:ला रोखू शकला नाही. स्टोक्सच्या चेंडुवरील त्याचा ड्राईव्ह पॉईटवरील रुटने ङोलात बदलला. धवनने 31 धावा केल्या. दुस:या बाजूला उभा असलेला मुरली विजय आज सर्व फटके पॅव्हेलियमध्ये ठेवून आला होता. त्याने बाहेरच्या चेंडूला ‘हाय- हॅलो’ न करता केवळ स्टम्पवरील चेंडूना तटविण्याची भूमिका घेवून इंग्लंडच्या गोलंदाजांचा अंत पाहिला. धवनच्या जागी आलेला चेतेश्वर पुजारा द्रवीडची कार्बनकॉपी असल्यासारखा सिलेक्टिव्ह शॉट खेळत होता. 
चहापानार्पयत ही जोडी मैदानावर तंबू ठोकून होती. त्यावेळी भारताच्या 
1 बाद 84 अशा धावा झाल्या 
होत्या. 44 व्या षटकांत 
प्लंकेटने पहिल्यांदा पुजाराचा 
तपोभंग केला. बाहेर जाणा:या चेंडूला त्याने छेडले आणि तो चेंडू 
त्याच्या बॅटची कड घेवून यष्टीरक्षक प्रायोरच्या हातात विसावला. 
पुजाराने 83 चेंडूला सामोरे जाताता 43 धावा केल्या.
तत्पूर्वी, गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ मारा करीत 82 धावांत 6 गडी बाद केल्याने भारताने दुस:या कसोटीत तिस:या दिवशी इंग्लंडला 319 धावांवर रोखले. भारताच्या पहिल्या डावांत 295 धावा होत्या; त्यामुळे इंग्लंडला 24 धावांची आघाडी घेता आली.
लॉर्ड्सवर भारताकडून सर्वश्रेष्ठ कामगिरी करणारा भुवनेश्वर दुसरा गोलंदाज ठरला. त्याआधी अमरसिंग यांनी 1936मध्ये 35 धावा देऊन 6 फलंदाजांना बाद केले होते. 
 
भारत पहिला डाव: 295 धावा; इंग्लंड पहिला डाव: 6 बाद 219 पासून पुढे : लियॉम प्लंकेट नाबाद 55, मॅट प्रायर ङो. धवन गो. शमी 23, बेन स्टोक्स त्रि. गो. भुवनेश्वर क्क्, स्टुअर्ट ब्रॉड ङो. धवन गो. भुवनेश्वर 4, जेम्स अॅण्डरसन ङो. रहाणो गो. जडेजा 19, अवांतर :2क्, एकूण : 1क्5.5 षटकांत सर्व बाद 319 धावा. गोलंदाजी: भुवनेश्वर कुमार 31-1क्-82-6, शमी 19-5-58-1, ईशांत 24-5-61-क्, बिन्नी 1क्-क्-45-क्, जडेजा 18.5-1-46-2, विजय 3-क्-12-1.
4भारत दुसरा डाव : मुरली विजय खेळत आहे 59, शिखर धवन ङो. रुट गो. स्टोक्स 31, चेतेश्वर पुजारा ङो. प्रायर गो. प्लंकेट 43, विराट कोहली त्रि. गो. प्लंकेट क्क्, अजिंक्य रहाणो ङो. प्रायर जो. ब्रॉड क्5, महेंद्रसिंह धोनी खेळत आहे 15; अवांतर: 19; एकूण : 63 षटकांत 4 बाद 169; गडी बाद क्रम: 1/4क्, 2/118, 3/118, 4/123; गोलंदाजी :  जेम्स अॅण्डरसन 18-7-36-क्, स्टुअर्ट ब्रॉड 14-5-41-1, बेन स्टोक्स 13-2-35-1,  लियॉम प्लंकेट 12-5-24-2, मोईन अली 6-1-14-क्.

 

Web Title: India back to foot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.