भारत- बांगलादेश अंतिम सामन्याला पावासामुळे विलंब
By Admin | Published: March 6, 2016 05:58 PM2016-03-06T17:58:02+5:302016-03-06T18:52:29+5:30
मिरपूरमध्ये अजूनही पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे भारत आणि बांगलादेशमध्ये अंतिम सामन्याच्या नाणेफेकीला विलंब होत आहेत.
ऑनलाइन लोकमत
ढाका, दि. ६ - मिरपूरमध्ये अजूनही पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे भारत आणि बांगलादेशमध्ये अंतिम सामन्याच्या नाणेफेकीला विलंब होत आहेत. पावसामुळे मैदानही ओले झाले आहे. पाऊस थांबल्यानंतर खेळपट्टी सुकवावी लागेल. त्यामुळे काही षटकांचा खेळ कमी होण्याची शक्यता आहे. मिरपूरच्या शेरे-ए-बांगला स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे.
सामन्यापूर्वी सरावासाठी मैदानावर उतरलेले दोन्ही संघाचे खेळाडू पाऊस सुरु झाल्यानंतर ड्रेसिंगरुमध्ये परतले. खेळपट्टीवर पुन्हा कव्हर घालण्यात आले आहे. मिरपूरमध्ये ढगाळ वातावरण आहे.
आशिया कप टी-२० स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारत आणि बांगलादेशमध्ये अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत भारत आतापर्यंत अजिंक्य राहिला असून, बांगलादेशला साखळी फेरीत फक्त भारताकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. पण त्यांनी त्यांच्यापेक्षा बलाढय असणा-या पाकिस्तान आणि श्रीलंका या संघावर मात केल्यामुळे बांगलादेशला कमी लेखून चालणार आहे.
अंतिम सामन्यापूर्वीच बांगलादेशी चाहत्यांनी धोनीच आक्षेपार्ह पोस्टर सोशल मिडियावर व्हायरला करुन आधीच वादाला सुरुवात केली आहे. यापूर्वीही एकदिवसीय मालिकेत भारताचा पराभव केल्यानंतर बांगलादेशी वर्तमानपत्राने असाच उद्दामपणा केला होता. त्यामुळे चाहत्यांमधली ही ठसन मैदानावरही दिसू शकते. भारतीय संघाला विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.
#AsiaCupT20Final : Rain again in Mirpur, covers have come on pic.twitter.com/SDG48Sdjo8
— ANI (@ANI_news) March 6, 2016