भारत-बांगलादेश सामना फिक्स

By admin | Published: March 21, 2015 01:13 AM2015-03-21T01:13:19+5:302015-03-21T01:13:19+5:30

विश्वचषकात गुरुवारी भारत-बांगलादेश ही उपांत्य लढत पूर्वनियोजित (फिक्स) होती खळबळजनक वक्तव्य आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बांगलादेशचे मुस्तफा कमाल यांनी केले आहे.

India-Bangladesh match fixes | भारत-बांगलादेश सामना फिक्स

भारत-बांगलादेश सामना फिक्स

Next

आयसीसी अध्यक्षांचा खळबळजनक आरोप : भारताला जिंकविण्यासाठी कटकारस्थान
सिडनी : विश्वचषकात गुरुवारी भारत-बांगलादेश ही उपांत्य लढत पूर्वनियोजित (फिक्स) होती आणि भारताला जिंकता यावे असेच निर्णय पंचांनी दिल्याचे खळबळजनक वक्तव्य आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बांगलादेशचे मुस्तफा कमाल यांनी केले आहे.
मेलबोर्न येथे झालेला हा सामना भारताने १०९ धावांनी जिंकला होता. या सामन्यात १३७ धावा ठोकणारा रोहित शर्मा ४० व्या षटकांत रुबेल हुसेनच्या चेंडूवर डिप मिडविकेटवर झेलबाद झाला. मात्र चेंडू कंबरेच्या वर असल्याने मैदानी पंच इयान ग्लाऊड यांनी तो ‘नो बॉल’ दिला होता. या निर्णयाविरोधात बांगलादेशात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
कमाल म्हणाले, ‘मी जे पाहिले त्यानुसार पंचांची कामगिरी खराब होती. अम्पायरिंग कुठल्याही दर्जाचे नव्हतेच. मनात पूर्वग्रह राखून दोन्ही पंच सामना खेळवत आहेत की काय असे दिसत होते. पंच चुका करू शकतात. त्यांची कृती हेतुपुरस्सर होती काय हे आयसीसी तपासणारच आहे. सर्व काही रेकॉर्डबद्ध आहे. आयसीसीला याचा तपास करावा लागेल, हे मी आयसीसी अध्यक्ष म्हणून नव्हे तर संघाचा चाहता म्हणून बोलत आहे.’

कमाल यांचे फिक्सिंगबाबतचे वक्तव्य हे आधारहीन तसेच पंचांच्या खराब कामगिरीवरील आरोप दुर्दैवी असल्याचे सांगून भारत-बांगला देश सामना फिक्स होता, हा आरोप आयसीसीने फेटाळला आहे. सीईओ डेव्ह रिचर्डसन म्हणाले,‘मुस्तफा कमाल यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. त्यांचे हे विधान खासगी असेल. आयसीसी अध्यक्ष या नात्याने पंचांच्या कामगिरीवर टीका करताना त्यांनी संयम बाळगला पाहिजे. पंचांच्या प्रामाणिकपणावर शंका घेण्याचे कारण नाही. ‘नो’ बॉलच्या निर्णयाचा कुणाला तरी लाभ होणारच पण खेळभावना सांगते की, पंचांच्या निर्णयाचा सन्मान व्हावा. भारताला जिंकविण्यासाठी मैदानी आणि तिसऱ्या पांचांनी एकतर्फी निर्णय घेतले असे म्हणणे सपशेल चुकीचे आणि दुर्दैवी आहे. आयसीसी कमाल यांचे विधान फेटाळून लावते.’

कमाल म्हणाले, ‘मी जे पाहिले त्यानुसार पंचांची कामगिरी खराब होती. अम्पायरिंग कुठल्याही दर्जाचे नव्हतेच. मनात पूर्वग्रह राखून दोन्ही पंच सामना खेळवत आहेत की काय असे दिसत होते.
- कमाल मुस्तफा,
अध्यक्ष, आयसीसी

पंचांविरोधात बीसीबी तक्रार करणार
दरम्यान, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने देखील मैदानी पंचांच्या विरोधात आयसीसीकडे पाठविण्यात येणाऱ्या अहवालात तक्रार करण्यात येईल, असे म्हटले आहे. बीसीबी अध्यक्ष नजमूल हसन म्हणाले, ‘आयसीसी अध्यक्ष कमाल यांच्यासोबत माझी चर्चा झाली. मैदानी पंचाविरुद्ध आयसीसीकडे जी काही दाद मागता येईल ती आम्ही मागणार आहोत.’

Web Title: India-Bangladesh match fixes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.