Asian Champions Trophy : चक दे इंडिया!; भारतीय संघानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानची जीरवली, उपांत्य फेरीत एन्ट्री मारली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 04:53 PM2021-12-17T16:53:04+5:302021-12-17T17:01:36+5:30
Men’s Asian Champions Trophy in Dhaka भारतानं मागील सामन्यात बांगलादेशवर 9-0 असा मोठा विजय मिळवला होता अऩ् आत पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली.
Men’s Asian Champions Trophy in Dhaka- बांगलादेश येथे सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतानं शुक्रवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 3-1 असा दणदणीत विजय मिळवला. भारतानं या विजयासह उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. भारताकडून हरमनप्रीतने उल्लेखनीय कामगिरी करताना दोन गोल केले, तर आकाशदीपनं एक गोल केला. पाकिस्तानकडून एकमेव गोल जुनैद मंजूर यानं केला. भारतानं मागील सामन्यात बांगलादेशवर 9-0 असा मोठा विजय मिळवला होता अऩ् आत पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली.
A phenomenal all-round performance earns India the BIG 𝐖 over Pakistan 💙#IndiaKaGame#HeroACT2021pic.twitter.com/uxwWQ7Pm9A
— Hockey India (@TheHockeyIndia) December 17, 2021
पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय खेळाडूंनी सामन्यावर मजबूत पकड घेतली. त्यामुळे 7व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि त्यावर हरमनप्रीतनं गोल करून 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारतीयांनी चेंडूवर ताबा राखताना पाकिस्तानवर दडपण निर्माण केलं होतं. पण, भारताच्या नीलम संजीवकडून फाऊल झाला आणि त्याला दोन मिनिटांसाठी मैदानाबाहेर बसावं लागलं. 10 खेळाडूंसह खेळणारा भारतीय संघ तरीही पाकिस्तानवर भारी पडला. भारतानं पहिल्या हाफमध्ये 1-0 अशी आघाडी कायम राखली.
तिसऱ्या क्वार्टरच्या पहिल्या पाच मिनिटांत भारतानं पाकिस्तानच्या गोलक्षेत्रात आक्रमण सुरू केले, परंतु त्यांना यश मिळत नव्हते. अखेर 42व्या मिनिटाला आकाशदीपनं अप्रतिम गोल करून भारताची आघाडी 2-0 अशी मजबूत केली. पण, 44व्या मिनिटाला पाकिस्तानकडून जुनैदनं गोल केला अन् पिछाडी 1-2 अशी कमी केली.
THE OTHER SIDE OF THE 🇮🇳 -🇵🇰 RIVALRY🏑
— SPORTS ARENA🇮🇳 (@SportsArena1234) December 17, 2021
An unreal display of sustained aggression against a deep defense sees Olympics🥉run out victors 3-1 against arch-rivals 🇵🇰
Two splendid PC conversions by Harmanpreet and a sleek field goal from Akashdeep (📽️) sees 🇮🇳 comfortably on top. pic.twitter.com/oPpoyDXcV0
चौथ्या क्वार्टरमध्ये 47व्या मिनिटाला पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नर मिळाला, परंतु भारताचा कर्णधार मनप्रीत सिंहनं रिव्ह्यू घेतला अन् हा कॉर्नर नाकारण्यात आला. 53व्या मिनिटाला पाकिस्तानकडे गोल करण्याची आयती संधी होती, परंतु भारताचा गोलरक्षक कृष्णा पाठकनं तो अडवला. 54व्या मिनिटाला मात्र हरमनप्रीतनं पेनल्टी कॉर्नरवर आणखी एक गोल करून भारताची आघाडी 3-1 अशी मजबूत केली अन् विजयही पक्का केला. उर्वरित वेळेत भारतानं बचावात्मक खेळ केला.