भारताची ऑस्ट्रेलियावर ३७ धावांनी मात
By admin | Published: January 26, 2016 05:33 PM2016-01-26T17:33:45+5:302016-01-26T17:46:18+5:30
एकदिवसीय सामन्यांची मालिका ४ - १ अशी दयनीयरीत्या हरणा-या भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी - २० सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे
Next
ऑनलाइन लोकमत
अॅडलेड, दि. २६ - एकदिवसीय सामन्यांची मालिका ४ - १ अशी दयनीयरीत्या हरणा-या भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी - २० सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. विराट कोहली, रोहित शर्मा व सुरेश रैना यांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर भारताने २० षटकांमध्ये १८८ धावा केल्या व ऑस्ट्रेलियाला १८९ धावांचे लक्ष्य दिले. ऑस्ट्रेलियाचा धाव १९.३ षटकांमध्ये १५१ धावांमध्ये गुंडाळत भारताने ३७ धावांनी विजय मिळवला आहे.
परंतु, अरॉन फिंच वगळता ऑस्ट्रेलियाचा एकही फलंदाज टिकला नाही. फिंचने ३३ चेंडूंमध्ये ४४ धावा केल्या. अश्विनने ४ षटकांमध्ये २८ धावा देत २ गडी बाद केले. जाडेजाने ४ षटकांमध्ये २१ धावा देत २ गडी बाद केले. हार्दिक पंड्या व बुमराहनेही प्रत्येकी २ गडी टिपले. आशिष नेहराने एक गडी बाद केला.
त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यामध्ये पहिली फलंदाजी करणा-या भारताने चांगली फटकेबाजी करत २० षटकांमध्ये ३ गडी गमावत १८८ धावा केल्या.
या सामन्यात युवराज सिंगचे पुनरागमन झाले असले तरी वरच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केल्यामुळे युवराजला फलंदाजीची संधी मिळाली नाही. विराट कोहलीने अवघ्या ५५ चेंडूंमध्ये ९० धावा फटकावल्या. तर रोहित शर्माने २० चेंडूंमध्ये ३१ धावा व सुरेश रैनाने ३४ चेंडूंमध्ये ४१ धावा केल्या.
शेवटच्या षटकात दुस-या चेंडूवर रैना बाद झाल्यावक आलेल्या महेंद्रसिंह धोनीने पहिल्याच चेंडूवर षटकार व दुस-या चेंडूवर चौकार लगावला. धोनीने ३ चेंडूंमध्ये ११ धावांची उपयुक्त खेळी केली.
तीन टी - २० सामन्यांची ही मालिका असून भारताने १ - ० अशी आघाडी घेतली आहे.
Winners are grinners! @imVkohli is all smiles after receiving the MoM award for his knock of 90 not out #AUSvINDpic.twitter.com/8bYoTv6Qxt
— BCCI (@BCCI) January 26, 2016