भारताचा बांगलादेशवर 240 धावांनी दणदणीत विजय

By admin | Published: May 30, 2017 09:20 PM2017-05-30T21:20:49+5:302017-05-30T21:20:49+5:30

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या लढतीपूर्वी झालेल्या अखेरच्या सराव सामन्यात भारताने बांगलादेशवर 240 धावांनी विजय मिळवला.

India beat Bangladesh by 240 runs | भारताचा बांगलादेशवर 240 धावांनी दणदणीत विजय

भारताचा बांगलादेशवर 240 धावांनी दणदणीत विजय

Next

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 30 - चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या लढतीपूर्वी झालेल्या अखेरच्या सराव सामन्यात भारताने बांगलादेशवर 240 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना शिखर धवन (60), दिनेश कार्तिक(94) आणि हार्दिक पांड्या (80*) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने 50 षटकात सात बाद 324 धावांचा डोंगर उभा केला होता. आयपीएलमध्ये खराब फॉर्ममध्ये असलेला रोहित शर्मा अपयशी ठरला. सलमीला फलंदाजीसाठी आलेल्या शर्मा एका धावेवर बाद झाला. बांगलादेशच्या रुबेल हुसैनने त्याच्या यष्ट्या उडवल्या. पहिल्या सराव सामन्यात अपशी ठरलेल्या रहाणेला दुसऱ्या सामन्यातही फारशी चमक दाखवता आली नाही. वैयक्तिक 11 धावसंखेवर तो बाद झाला. आजच्या भारताच्या फलंदाजीचे वैशिष्ट्य म्हणाल तर हार्दिक पांड्या आहे. पांड्याने 54 चेंडूचा सामना करताना सहा षटकार लगावत नाबाद 80 धावांची खेळी केली. त्याला जाधव, जाडेजाने उत्तम साथ दिली.

325 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात अतिशय खराब झाली. सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजावर वर्चस्व गाजवले. संघाच्या 11 धावा असताना सौम्य सरकार बाद झाला तेथून बांगलादेश संघाला सावरालाय जमले नाही. 11 धावावर एक बाद ते 22 धावांवर सहा बाद अशी दयणीय अवस्था झाली होती. 24 षटकांत 84 धावसंखेवर बांगलादेशचा सर्व संघ बाद झाला. भारताकडून उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमारने टिच्चून मारा करताना प्रत्येकी तीन बळी मिळवले. जसप्रित बुमराह, शमी, पांड्या आणि अश्विन यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.

Web Title: India beat Bangladesh by 240 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.