भारताचा बांगलादेशवर ४५ धावांनी विजय

By admin | Published: February 24, 2016 10:21 PM2016-02-24T22:21:43+5:302016-02-24T22:48:16+5:30

आशिया चषकाच्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशवर ४५ धावांनी विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशला १६७ धावांचे आव्हान दिले होते

India beat Bangladesh by 45 runs | भारताचा बांगलादेशवर ४५ धावांनी विजय

भारताचा बांगलादेशवर ४५ धावांनी विजय

Next
>ऑनलाइन लोकमत
मिरपूर, दि. २४ -  आशिया चषकाच्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशवर ४५ धावांनी विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माच्या धडाकेबाज ८३ धावा आणि हार्दिक पांड्याच्या झटपट ३१ धावांच्या बळावर बांगलादेशसमोर विजयासाठी १६७ धावांचे आव्हान ठेवले होते.
 
 
भारतीय गोलंदाजानी अचूक टप्यावर गोलंदाजी करत भारताला ४५ धावांनी विजय मिळवून दिला. भारतातीय गोंलदाजापुढे बांगलादेश संघाला २० षटकात ७ गड्याच्या मोबदल्यात १२१ धावाच बनवता आल्या. भारतार्फे अनुभवी नेहराने बांगलादेशच्या ३ फलंदाजाला बाद केले तर बुमरा, अश्विन आणि पांड्याने एका फलंदाजाला बाद केले.
 
 
आशिया चषकातील पहिला सामना जिंकून भारताने आपली सुरवात विजयाने केली आहे पण २७ तारखेस भारताला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना करावयाचा आहे.
 
 
दरम्यान, आशिया चषकाच्या सलामीच्या लढतीत बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं होत. खराब सुरवातीनंतर रोहित शर्मोच्या (८३) धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारताने १६६ धावापर्यंत मजल मारली व बांगलादेशसमोर विजयासाठी १६७ धावांचे आव्हान ठेवले आहे. रोहित (रो'हिट') शर्माने ५५ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने तुफानी ८३ धावा केल्या.  
 
 
रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याने शेवटच्या हाणामारीच्या षटकात भारताला चांगली धावसंख्या जमवून दिली. पांड्याने १८ चेंडूत झटपट ३१ धावांचे योगदान दिले. त्यात त्याने ४ चौकार आणि एक षटकार लगावला.आशिया चषकाच्या सलामीच्या सामन्यात भारतीय फलंदाजानी खराब सुरवात केली, सामना सुरु झाल्या नंतर दुसऱ्या षटकात सलामीवीर शिखर धवन वैयक्तिक २ धावावर बाद झाला. सुरेश रैना १३ धावावर बाद झाला. तर संघाच्या २२ धावा असताना धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीला मशरफी मुर्तजाने ८ धावावर बाद केले. कर्णधार धोणीने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत २ चेंडूत नाबाद ८ धावा केल्या 
 
 
रोहित शर्माने युवराजच्या सोबत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला पण मोठा फटका मारण्याच्या नादात युवराज १५ धावावर बाद झाला आणि भारताला चौथा धक्का बसला. शेवटची षटके असल्यामुले धोणी आपल्या आधी हार्धिक पांड्याला बडती दिली. पांड्याने फटकेबाजी करताना १८ चेंडूत ३१ धावा केल्या 
 
भारतात होणाऱ्या आगामी  विश्व टी-२० स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया कप स्पर्धा वन-डे ऐवजी टी-२० फॉर्मेटमध्ये खेळल्या जाणार आहेत .
 
प्रतिस्पर्धी संघ
भारत :-
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग, रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या, आशिष नेहरा, आर. आश्विन, जसप्रीत बुमराह
बांगलादेशचा संघ : 
इमरुल कैस, सौम्या सरकार, सब्बीर रेहमान, महमदुल्ला, शकीब अल हसन, मुशफिकूर रहीम (यष्टिरक्षक), मशरफी मोर्तझा (कर्णधार), महंमद मिथून, अल अमीन होसेन, मुस्तफिझूर रेहमान, टस्किन अहमद.
 

Web Title: India beat Bangladesh by 45 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.