भारताची हाराकिरी, इंग्लंडचा २६६ धावांनी विजय

By admin | Published: July 31, 2014 05:29 PM2014-07-31T17:29:51+5:302014-07-31T17:45:41+5:30

कसोटीच्या पहिल्या दिवसापासून इंग्लंडने सामन्यावर मिळवलेली पकड अजिबात ढिली न सोडता भारताला तिस-या कसोटीत २६६ धावांनी धूळ चारली.

India beat Harkiris, England by 266 runs | भारताची हाराकिरी, इंग्लंडचा २६६ धावांनी विजय

भारताची हाराकिरी, इंग्लंडचा २६६ धावांनी विजय

Next
>ऑनलाइन टीम
साऊदम्प्टन, दि. ३१ - कसोटीच्या पहिल्या दिवसापासून इंग्लंडने सामन्यावर मिळवलेली पकड अजिबात ढिली न सोडता भारताला तिस-या कसोटीत २६६ धावांनी धूळ चारली. इंग्लंडच्या ४४५ धावांचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव अवघ्या १७८ धावांमध्ये संपुष्टात आला आणि इंग्लंडने तिसरी कसोटी जिंकत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १ -१ अशी बरोबरी केली. अजिंक्य रहाणेने पहिल्या डावाप्रमाणेच दुस-या डावातही चांगला खेळ करत (५२) भारताचा  डाव सावरायचा प्रयत्न केला मात्र त्याला इतर फलंदाजांची पुरेशी साथ न मिळाल्याने भारताचा डाव गडगडला. इंग्लंडतर्फे मोईन अलीने तब्बल ६ बळी टिपले तर अँडरसनने २ व रूटने १ गडी बाद केला. 
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणा-या इंग्लंडतर्फे कप्तान (९५), बॅलन्स ( १५६) आणि बेल (१६७) यांनी दमदार फलंदाजी करत भारतापुढे ५६९ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना रहाणे (५४) व धोनीशिवाय (५०) भारताचा कोणीही फलंदाज जास्त टिकू शकला नाही आणि परिणामी भारताचा डाव ३३० धावांवरच संपुष्टात आला. इंग्लंडने भारताला फॉलोऑन न देता दुस-या डावाचीही चांगली सुरूवात केली. कूकच्या ७० धावांच्या नाबाद खेळीमुळे इंग्लंडने २०५ धावांचा टप्पा ओलांडला आणि त्यानंतर डाव घोषित करत भारतापुढे जिंकण्यासाठी ४४५ धावांचे आव्हान ठेवले.
मात्र दुस-या डावातही भारतीय फलंदाज खास खेळ करू शकले नाहीत व भारताचा डाव अवघ्या १७८ धावांवर संपुष्टात आला आणि इंग्लंडने तब्बल २६६ धावांनी तिसरी कसोटी जिंकली. 

Web Title: India beat Harkiris, England by 266 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.