महामुकाबल्यात भारताचा विजय, पाकिस्तानाला 124 धावांनी लोळवलं
By admin | Published: June 4, 2017 11:30 PM2017-06-04T23:30:30+5:302017-06-04T23:32:11+5:30
चॅम्पियन्स ट्रॉफीत आज झालेल्या महामुकाबल्यात भारताने पाकिस्तानला 125 धावांनी लोळवतं आयसीसीच्या या स्पर्धेची सुरुवात झोकात केली.
ऑनालइन लोकमत
बर्मिंगहॅम, दि. 4 - चॅम्पियन्स ट्रॉफीत आज झालेल्या महामुकाबल्यात भारताने पाकिस्तानला 125 धावांनी लोळवतं आयसीसीच्या या स्पर्धेची सुरुवात झोकात केली. भारताने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानाला 320 धावांचे आव्हान दिले होते. पण पावसाच्या व्यत्ययामुळे पाकिस्तानाला 41 षटकांत 289 धावांचे सुधारीत लक्ष दिले होते. या लक्षाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 164 धावांत बाद झाला. भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच पाकिस्तानवर दबाव निर्माण केला. भारताकडून यादवने तीन फलंदाज बाद केले तर पंड्या, आणि जाडेजाने प्रत्येकी दोन बळी मिळवले. तर भुवनेश्वर कुमारने एक बळी घेतला
भुवनेश्वर कुमारने सलामीवीर अहमद शहझादला 12 धावांवर पायचीत केल्यावर उमेश यादवने फॉर्मात असलेल्या बाबर आझमला स्वस्तात माघारी धाडले आहे. बाबर आझामला उमेश यादवने ८ धावांवर बाद केले. यानंतर खेळपट्टीवर जम बसवलेल्या अझर अलीला जाडेजाने तंबूचा रस्ता दाखवला. सलामीवीर अजहर अलीने दमदार अर्धशकत करत संघाची धावसंख्या वाढवली. पण अर्धशतकानंतर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. शोयब मलिकने सुरुवातीपासूनच फटकेबाजी करत संघाची धावसंऱ्या वाढवण्याता प्रयत्न केला. पण जाडेजाच्या एका सुरेख फेकीवर मलिक बाद झाला. मलिक बाद झाल्यानंतर कर्णधार सर्फराज अहमदही तंबूत परताला. सर्फराज अहमदला हार्दिक पंड्याने 15 धावांवर धोनीकरवी झेलबाद केले. अमाद वासिमही हार्दिक पंड्याचा शिकार ठरला.
त्यापूर्वी, एकीकडे एजबेस्टनच्या मैदानात पावसाची रिमझिम सुरू असतानाच भारतीय फलंदाजांनीही धावांची जोरदार बरसात केली. रोहित शर्मा, शिखर धवन, युवराज सिंग आणि विराट कोहली यांनी फटकावलेली शानदार अर्धशतके आणि शेवटच्या षटकात हार्दिक पंड्याने केलेल्या षटकारांच्या आतषबाजीच्या जोरावर भारताने 3 बाद 319 धावा कुटल्या.
धावफलक
भारत : रोहित शर्मा धावबाद (बाबर आझम/सर्फराज अहमद) ९१, शिखर धवन झे. अझहर अली गो. शादाब खान ६८, विराट कोहली नाबाद ८१, युवराज सिंग पायचीत गो. हसन अली ५३, हार्दिक पंड्या नाबाद २0. एकूण : ४८ षटकांत ३ बाद ३१९.
गडी बाद क्रम : १-१३६ (शिखर धवन, २४.३), २-१९२ (रोहित शर्मा, ३६.४). ३-२८५ (युवराज सिंग, ४६.२).
गोलंदाजी : मोहंमद आामर ८.१-१-३२-0, इमाद वसीम ९.१-0-६६-0, हसन अली १0-0-७0-१, वहाब रियाज ८.४-0-८७-0, शादाब खान १0-0-५२-१, शोएब मलिक २-0-१0-0.