Asian Champions Trophy Hockey 2021: चक दे इंडिया! भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला चारली धूळ; मिळवलं कांस्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 05:12 PM2021-12-22T17:12:03+5:302021-12-22T17:50:31+5:30

आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला अटीतटीच्या सामन्यात ४-३ असं पराभूत केलं.

India beat Pakistan 4-3 to win bronze medal in Asian Champions Trophy Hockey 2021 | Asian Champions Trophy Hockey 2021: चक दे इंडिया! भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला चारली धूळ; मिळवलं कांस्यपदक

Asian Champions Trophy Hockey 2021: चक दे इंडिया! भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला चारली धूळ; मिळवलं कांस्यपदक

Next

Asian Champions Trophy Hockey 2021: भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानच्या संघाला आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत ३-४ अशी धूळ चारली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत रंगतदार होणार याची चाहत्यांना अपेक्षा होती. त्यानुसार शेवटच्या मिनिटापर्यंत खेळ रंगला आणि अखेर भारतीय संघ पाकिस्तानी खेळाडूंवर वरचढ ठरला. जपानकडून ३-५ असा सपाटून मार खाल्ल्यानंतर भारतीय संघासाठी आजचा सामना जिंकणं हा प्रतिष्ठेचा प्रश्न होता. भारतीय हॉकीपटूंनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत पाकिस्तानी संघाला पराभूत केल. विशेष म्हणजे, कर्णधार मनप्रीत सिंगने संघाचे उत्तम नेतृत्व केले आणि सामनावीराचा किताबही पटकावला.

भारतीय संघाने सुरूवातीपासूनच पाकिस्तानवर वर्चस्व राखलं. पहिल्या पाच मिनिटांच्या खेळातच भारतीय संघाने पहिला गोल करत सामन्यात १-०ची आघाडी घेतली. पेनल्टी कॉर्नरचा योग्य वापर केल्याने भारताला पहिला गोल मिळाला. काही काळ झुंजवल्यानंतर अखेर ११व्या मिनिटाला पाकिस्तानकडूनही अर्फराजने दमदार गोल करत सामना बरोबरीत आणला. त्यानंतर पूर्वार्धाच्या खेळात (Half Time) आणखी गोल झाले नाहीत.

उत्तरार्धाचा खेळ सुरू झाला त्यावेळी भारत आणि पाकिस्तान बरोबरीत होते. त्यामुळे सामना नक्की कोणत्या दिशेने झुकतो याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष होते. ३३व्या मिनिटाला अब्दुल राणाने  पाकिस्तानला आघाडी मिळवून दिली. पण ४५व्या मिनिटाला सुमीत सिंगने भारताला पुन्हा बरोबरीत आणले. शेवटच्या १५ मिनिटात खेळ अधिकच रंगत गेला. ५३व्या मिनिटाला वरूण कुमार तर ५७व्या मिनिटाला आकाशदीप सिंगने गोल करत भारताला आघाडीवर नेले. अवघ्या काही सेकंदातच पाकिस्तानच्या नदीमने एक गोल करत गोलमधील अंतर कमी केले. पण खेळ संपेपर्यंत भारताने पाकला गोल करू न दिल्याने अखेर भारत ४-३ने विजयी झाला.

Web Title: India beat Pakistan 4-3 to win bronze medal in Asian Champions Trophy Hockey 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.