आयसीसी महिला विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवर 95 धावांनी शानदार विजय

By admin | Published: July 2, 2017 09:18 PM2017-07-02T21:18:51+5:302017-07-02T21:31:05+5:30

आयसीसी विश्वचषकात भारतीय महिला संघानं पाकिस्तानवर 95 धावांनी शानदार विजय मिळवला आहे

India beat Pakistan by 95 runs in ICC Women's World Cup | आयसीसी महिला विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवर 95 धावांनी शानदार विजय

आयसीसी महिला विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवर 95 धावांनी शानदार विजय

Next

ऑनलाइन लोकमत
डर्बी, दि. 2 - आयसीसी विश्वचषकात भारतीय महिला संघानं पाकिस्तानवर 95 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिलांनी पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. भारतानं दिलेल्या 170 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ 38 षटकांत सर्वबाद 74 धावांतच गारद झाला आहे. भारताकडून एकता बिश्ट हिनं सर्वाधिक 5 बळी मिळवले आहेत. गोस्वामी, शर्मा, जोशी आणि कौर यांनीही प्रत्येकी एक बळी टिपला आहे. पाकिस्तानकडून साना मीर आणि नाहिदा खान वगळता इतर कोणालाही धावसंख्येत दुहेरी आकडा गाठता आला नाही. पाकिस्तानकडून नाहिदा खान हिनं चमकदार कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. नाहिदा खान हिनं 3 चौकारांच्या जोरावर 23 धावांपर्यंत मजल मारली. मात्र कौरच्या गोलंदाजीवर तिचा निभाव न लागल्यानं ती तंबूत परतली. सिद्रा नवाज, इराम जावेद, अस्वामिया इक्बाल, डायना बेग यांना भोपळाही फोडता आला नाही. पहिल्या दोन सामन्यांवर कब्जा मिळवलेला भारतीय महिलांचा संघ या सामन्यात सुरुवातीला काहीसा ढेपाळला होता. मात्र भारतीय महिलांनी पुन्हा एकदा सामन्यावर ताबा मिळवला.

भारतीय महिला संघानं नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानच्या नशरा संधू आणि सादिया युसूफ यांच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय महिला फलंदाजांनी गुडघे टेकायला लावल्याचं चित्र उभं राहिलं होतं. पहिल्या दोन सामन्यांवर वर्चस्व गाजवणा-या भारतीय महिलांनी आयसीसी विश्वचषकावरही नाव कोरलं आहे. स्मृती मंधाना, मिताली राज, हरमनप्रीत कौर यांनी लागोपाठ बळी दिल्यानं भारतीय महिला संघाला चमकदार कामगिरी दाखवता आली नव्हती. भारताकडून पूनम राऊतने 47 धावांची खेळी करत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पराभवाच्या छायेत असलेल्या भारतीय संघाला एकदा बिश्ट हिनं नवसंजीवनी मिळवून दिली आणि विजयश्री खेचून आणला.  
 

Web Title: India beat Pakistan by 95 runs in ICC Women's World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.