भारताची स्कॉटलंडवर मात
By admin | Published: July 27, 2014 01:32 AM2014-07-27T01:32:20+5:302014-07-27T01:32:20+5:30
रघुनाथ व रुपिंदर सिंग यांनी पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदविले. स्कॉटलंडतर्फे एकमेव गोल केनी बेन याने दुस:या हाफमध्ये नोंदविला.
Next
ग्लास्गो : व्ही. आर. रघुनाथ व रुपिंदर सिंग यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी 2 गोलच्या जोरावर भारतीय पुरुष हॉकी संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शनिवारी यजमान स्कॉटलंडचा 6-2 ने धुव्वा उडवित ‘अ’ गटात आगेकूच कायम राखली. भारतातर्फे गुरबाजसिंग व गुरविंदर सिंग यांनी मैदानी गोल नोंदविले. रघुनाथ व रुपिंदर सिंग यांनी पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदविले. स्कॉटलंडतर्फे एकमेव गोल केनी बेन याने दुस:या हाफमध्ये नोंदविला.
गुरबाजने मैदानी गोल नोंदवत भारताला 1-क् अशी आघाडी मिळवून दिली. भारताला पहिल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदविता आला नाही, पण रघुनाथने दुस:या पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅग फ्लिकने गोल करीत मध्यंतरार्पयत भारताला 2-क् अशी आघाडी मिळवून दिली.
दुस:या सत्रत 37 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर रुपिंदरने चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखवित संघाला 3-क् अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर तीन मिनिटांनी चांडीने गोल करीत संघाला 4-क् अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. रघुनाथ व रुपिंदर यांनी पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवित भारताला 6-क् अशी आघाडी मिळवून दिली. केनी बेनने मैदानी गोल नोंदवित स्थानिक चाहत्यांना काही अंशी दिलासा दिला. स्कॉटलंडने अखेरच्या क्षणी काही चांगल्या चाली रचल्या. त्यांना अखेरच्या क्षणी पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर निकोलस पार्क्सने नोंदविलेला गोल स्कॉटलंड संघासाठी पराभवातील अंतर कमी करणार ठरला. (वृत्तसंस्था)