भारताचा झिम्बाब्वेवर तीन धावांनी विजय
By admin | Published: June 22, 2016 08:05 PM2016-06-22T20:05:35+5:302016-06-22T20:05:35+5:30
टी-२० मालिकेच्या तिस-या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा ३ धावांनी पराभव करत मालिका २-१ ने जिंकली. या सामन्यात भारताने झिम्बाब्वेला १३९ धावांचे आव्हान दिले.
Next
>ऑनलाइन लोकमत
हरारे, दि. २२ - टी-२० मालिकेच्या तिस-या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा ३ धावांनी पराभव करत मालिका २-१ ने जिंकली.
या सामन्यात भारताने झिम्बाब्वेला १३९ धावांचे आव्हान दिले. याचा सामना करताना झिम्बाब्वे चांगली खेळी केली. मात्र शेवट्या फळीत भारताने दिलेले आव्हान पूर्ण करता आले नाही. अवघ्या तीन धावांनी पराभव स्विकारावा लागला.
या सामन्यात झिम्बाब्वेने २० षटकात सहा बाद १३५ धावा केल्या. फलंदाज वुसी सिबांडाने २८ धावा केल्या,तर मुरुमाने नाबाद २३ धावा केल्या.
भारताने २० षटकात सहा बाद १३८ धावा केल्या होता. यात फलंदाज केदार जाधवने सर्वाधिक जास्त धावा केल्या. त्याने ४२ चेंडूत एक षटकार आणि सात चौकार लगावत ५८ धावा कुटल्या. तर, के एल राहुलने २२ धावा केल्या. मनदीप सिंह अवघ्या चार धावा काढून तंबूत परतला. अंबाती रायडू (२०) , मनीष पांडे (०), महेंद्रसिंग धोणी (९), अक्षर पटेल नाबाद (२०) आणि धवल कुलकर्णीने नाबाद १ धावा केल्या.
झिम्बाब्वेकडून गोलंदाज डोनाल्ड तिरिपानोने तीन बळी घेतले. तर, नेविल मादजिवा आणि क्रेमर यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.