भारताच्या कबड्डी संघाने जिंकले सुवर्ण, इराणला नमवून ठरले आशियाई चॅम्पियन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 12:56 PM2023-06-30T12:56:18+5:302023-06-30T12:56:39+5:30

इराणला त्यांनी साखळी फेरीत दोनवेळा आधीच पराभूत केले होते, परंतु आज इराणकडून कडवी टक्कर पाहायला मिळाली.

India beats Iran 42-32 in the final to win gold in the Asian Kabaddi Championship | भारताच्या कबड्डी संघाने जिंकले सुवर्ण, इराणला नमवून ठरले आशियाई चॅम्पियन

भारताच्या कबड्डी संघाने जिंकले सुवर्ण, इराणला नमवून ठरले आशियाई चॅम्पियन

googlenewsNext

भारताच्या पुरूष संघाने शुक्रवारी ११ व्या आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये तगड्या इराणवर ४२-३२ असा विजय मिळवताना सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत भारतीय संघाचे वर्चस्व पाहायला मिळाले आणि त्यांनी सर्वच्या सर्व सहा सामने जिंकले. इराणला त्यांनी साखळी फेरीत दोनवेळा आधीच पराभूत केले होते, परंतु आज इराणकडून कडवी टक्कर पाहायला मिळाली.  

इराणच्या मोहम्मदने संघाचे खाते उघडले, अर्जुन देश्वालच्या काही चढाया अपयशी ठरल्यानंतर त्याने अखेर पहिला गुण मिळवून दिला. ३-३ अशा बरोबरीपर्यंत सामना अटीतटीचाच वाटत होता, परंतु नितेशची मजबूत पकड अन् पवन शेहरावतच्या चढायांच्या जोरावर भारताने १०-४ अशी आघाडी घेतली. त्यानंतर भारतीय संघाने मागे वळून पाहिले नाही. नितिन रावतनेही चांगल्या पकडी केल्या. पहिल्या हाफमध्ये भारताने २३-११ अशी आघाडी मजबूत केली होती. 


दुसऱ्या हाफमध्ये इराणकडून तुलनेने चांगला खेळ पाहायला मिळाला. ३३-१४ अशा पिछाडीवर असलेल्या इराणने सामना ३८-३० असा चुरशीचा बनवला. भारताला केवळ पाच गुण कमावता आले, तर दुसरीकडे इराणने १६ गुणांची कमाई केली. शेवटच्या टप्प्यात भारताच्या खेळाडूंनी सावध खेळ करत ४२-३२ असा विजय पक्का केला. 

 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results


 

Web Title: India beats Iran 42-32 in the final to win gold in the Asian Kabaddi Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.