भारताने कोरियाला रोखले

By admin | Published: April 6, 2015 03:10 AM2015-04-06T03:10:24+5:302015-04-06T03:10:24+5:30

अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत रविवारी भारताने बलाढ्य कोरियाला २-२ असे बरोबरीत रोखले. यामुळे भारत आणि कोरियाला प्रत्येकी एक गुण मिळाला

India blocked Korea | भारताने कोरियाला रोखले

भारताने कोरियाला रोखले

Next

इपोह : अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत रविवारी भारताने बलाढ्य कोरियाला २-२ असे बरोबरीत रोखले. यामुळे भारत आणि कोरियाला प्रत्येकी एक गुण मिळाला. नवीन प्रशिक्षक व्हॅन अ‍ॅस यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने रविवारी समाधानकारक खेळ केला.
रियो आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारताने सामन्याच्या प्रारंभापासूनच आक्रमक खेळ केला. सामन्याच्या सहाव्या मिनिटाला कोरियाच्या खेळाडूंनी रचलेली चाल भारताच्या रमणदीप सिंगने अडविली. त्यानंतर अवघ्या चारच मिनिटांनी भारताच्या निखिल थिमाजा याने गोल करीत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर भारताने पुन्हा आक्रमक खेळ करण्यास प्रारंभ केला. रमणदीप, गुरुबाज, आकाशदीप यांनी केलेले प्रयत्न गोलमध्ये रूपांतरित होऊ शकले नाही. दरम्यान, कोरियाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे रूपांतरही त्यांना गोलमध्ये करता आले नाही. सामन्याच्या २४ व्या मिनिटाला कोरियाच्या हेस्युंग हेन याने गोल करीत संघाला १-१ असे बरोबरीत नेले. (वृत्तसंस्था)

Web Title: India blocked Korea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.