क्लीन स्वीपसाठी भारताला 322 धावांचे आव्हान
By Admin | Published: January 22, 2017 02:18 PM2017-01-22T14:18:37+5:302017-01-22T17:19:13+5:30
मालिकेत निर्विवाद आघाडी घेणाऱ्या टीम इंडियाला ईडन गार्डन्सवर इंग्लंडला पुन्हा मात देत ३ सामन्यांच्या वन डे मालिकेत पाहुण्यांचा सफाया करण्यासाठी 50 षटकात 322 धावांचं आव्हान आहे.
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 22 - मालिकेत निर्विवाद आघाडी घेणाऱ्या टीम इंडियाला ईडन गार्डन्सवर इंग्लंडला पुन्हा मात देत ३ सामन्यांच्या वन डे मालिकेत पाहुण्यांचा सफाया करण्यासाठी 50 षटकात 322 धावांचं आव्हान आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने आठ बाद 321 धावा केल्या आहेत.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केल्यानंतर इंग्लंडच्या समामीवीरांनी सावध सुरुवात करताना पहिल्या 10 षटकात नाबाद 43 धावांची भागीदारी केली होती. 10 षटकानंतर जेसन रॉय आणि सॅंम बिलिंग्ज तडफदार फटक्यांनी धावा वसूल करण्यास सुरूवात केली. सलामीजोडी भारतासाठी डोकेदुखी ठरत असताना रवींद्र जडेजाने जेनिंग्जला बाद केले. त्यानंतर दुसरी विकेट देखील जडेजानेच घेतली. घातक जेसन रॉय(65) याचा जडेजाने त्रिफळा उडवून तंबूत धाडले. त्यानंतर कर्णधार मॉर्गन आणि बेअरस्टो यांनी चांगली फटकेबाजी करून डाव सावरला. पण पंड्याच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात मॉर्गन 43 धावांवर झेलबाद झाला. बेअरस्टोने अर्धशतक ठोकले खरे पण तो देखील 56 धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला. जोस बटलरला (11) देखील पंड्याने माघारी धाडले. तर बुमराहने मोईन अली याला बाऊन्सवर झेलबाद करून बाद केले. अखेरच्या षटकात वोक्स 19 चेंडूत 34 धावा काडून धावबाद झाला. तर स्टोक्सने नाबाद 57 धावांची खेळी केली.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाआधी इंग्लंडला क्लीन स्वीप देण्याची भारताला ही मोठी संधी असेल. भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमरा यांच्या अचूक माऱ्यासमोर वेगाने धावा जमवता न आल्याने पहिल्या दहा षटकात इंग्लंडला बिनबाद 43 धावांपर्यंतच मजल मारता आली होती. मात्र त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी खोऱ्याने धावा वसूल केल्या. भारताकडून हार्दिक पांड्याने 3, जडेजाने 2 तर बुमराहने एका फलंदाजाला बाद केले.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर भारतीय संघाने संघात एक बदल करताना शिखर धवनऐवजी अजिंक्य रहाणेला संधी दिली होती.