India at Commonwealth Games 2018: ही आकडेवारी तुम्हाला माहिती आहेत का....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 04:01 PM2018-04-02T16:01:24+5:302018-04-02T16:01:24+5:30
या स्पर्धेत कोणते खेळ खेळले जातात, किती पदके दिली जातात, किती देश आणि खेळाडू खेळणार आहेत, यावर दृष्टीक्षेप टाकण्याचा हा एक प्रयत्न.
मुंबई : ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट येथे 4 ते 15 एप्रिल या कालावधीमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत कोणते खेळ खेळले जातात, किती पदके दिली जातात, किती देश आणि खेळाडू खेळणार आहेत, यावर दृष्टीक्षेप टाकण्याचा हा एक प्रयत्न.
हा खेळ आकड्यांचा
18 : या स्पर्धेत एकूण 18 खेळांचा समावेश करण्यात आला आहे. या 18 पैकी 10 खेळ हे कायम असतात.
10 : या 10 खेळांमध्ये अॅथलेटीक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, लॉन बॉल, नेट बॉल, रग्बी, स्क्वॉश, जलतरण आणि वेटलिफ्टिंग या खेळांचा समावेश आहे.
8 : या आठ पर्यायी खेळांमध्ये बास्केटबॉल, बिच व्हॉलीबॉल, सायकलिंग, जिम्नॅस्टिक, नेमबाजी, टेबल टेनिस, कुस्ती, ट्रायथ्लॉन यांचा समावेश आहे.
275 : या स्पर्धेत खेळाडूंना 275 सुवर्णपदके जिंकता येणार आहे.
71 : या स्पर्धेत एकूण 71 देश सहभागी होणार आहेत.
6600 : या स्पर्धेत 6600पेक्षा जास्त खेळाडू सहभागी होणार आहेत.