भारत नेदरलँडकडून १-३ ने पराभूत

By admin | Published: June 21, 2017 12:47 AM2017-06-21T00:47:56+5:302017-06-21T00:47:56+5:30

कडव्या संघर्षानंतरही भारताला मंगळवारी हॉकी विश्व लीग सेमीफायनलमध्ये वरचे मानांकन असलेल्या नेदरलँडविरुद्ध १-३ ने पराभव स्वीकारावा लागला.

India defeated 1-3 by Netherlands | भारत नेदरलँडकडून १-३ ने पराभूत

भारत नेदरलँडकडून १-३ ने पराभूत

Next

लंडन : कडव्या संघर्षानंतरही भारताला मंगळवारी हॉकी विश्व लीग सेमीफायनलमध्ये वरचे मानांकन असलेल्या नेदरलँडविरुद्ध १-३ ने पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेतील भारताचा हा पहिला पराभव ठरला.
सर्व गोलची नोंद पहिल्या दोन क्वार्टरमध्ये झाली. नेदरलँडतर्फे थियरे ब्रिंकमॅन (दुसरा मिनिट), सँडर बार्ट (१२ वा मिनिट) आणि मायक्रो प्रुइसन (२४ वा मिनिट) यांनी गोल नोंदवले, तर भारतातर्फे एकमेव गोल आकाशदीप सिंग याने केला.
या पराभवामुळे भारताच्या स्पर्धेतील वाटचालीवर विशेष परिणाम झाला नाही. कारण भारताने यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला होता. भारताने यापूर्वी साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकले होते.
या विजयासह नेदरलँडने ‘ब’ गटात अव्वल स्थान पटकावले. त्यांनी सर्वंच लढतींमध्ये विजय मिळवला. भारताने चारपैकी तीन लढतींमध्ये विजय मिळवला. भारत दुसऱ्या स्थानी आहे. आता गुरुवारी खेळल्या जाणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीत भारताला मलेशियाच्या, तर नेदरलँडला ‘अ’ गटात चौथ्या स्थानावर असलेल्या चीनच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
भारताविरुद्धच्या लढतीत नेदरलँडला सुरुवातीपासून विजयासाठी पसंती देण्यात येत होती. भारताने संथ सुरुवात केली, तर नेदरलँडने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा स्वीकारला. दुसऱ्याच मिनिटाला सरदार सिंगला चेंडूवर नियंत्रण राखता आले नाही आणि ब्रिंकमॅनने संघाला आघाडी मिळवून देण्यात कुठलीच चूक केली नाही.
युवा आकाश चिकटेने त्यानंतर सहाव्या मिनिटाला योनस डी गेयुसचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. नेदरलँडने १२ व्या मिनिटाला २-० अशी आघाडी घेतली. संघाला मिळालेल्या पहिल्या पेनल्टी कॉर्नरचे त्यांनी गोलमध्ये रूपांतर केले. प्रत्युत्तर देताना भारताने पेनल्टी कॉर्नर मिळवला, पण त्याचा लाभ घेता आला नाही. नेदरलँडने २४ व्या मिनिटाला ३-० अशी आघाडी घेतली. प्रुइसनने ब्योर्न कोलरमॅनच्या पासवर चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविला.
आकाशदीपच्या शानदार प्रयत्नामुळे भारताने लढतीत पुनरागमन केले. त्याने मैदानी गोल नोंदवला. (वृत्तसंस्था)

Web Title: India defeated 1-3 by Netherlands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.