रंगतदार लढतीत भारत पराभूत

By admin | Published: October 21, 2016 01:21 AM2016-10-21T01:21:42+5:302016-10-21T01:21:42+5:30

अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार ठरलेल्या दुसऱ्या वन-डे लढतीत न्यूझीलंडने गुरुवारी भारताचा ६ धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या १-१ अशी बरोबरी साधली.

India defeated in a colorful match | रंगतदार लढतीत भारत पराभूत

रंगतदार लढतीत भारत पराभूत

Next

नवी दिल्ली : अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार ठरलेल्या दुसऱ्या वन-डे लढतीत न्यूझीलंडने गुरुवारी भारताचा ६ धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या १-१ अशी बरोबरी साधली. अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी १० धावांची गरज होती. त्यात पहिल्या दोन चेंडूंवर उमेश यादवने तीन धावा घेतल्या. त्यानंतर स्ट्राईकवर आलेल्या जसप्रीत बुमराहला टीम साऊदीने क्लीनबोल्ड करीत न्यूझीलंडला दौऱ्यातील पहिला विजय मिळवून दिला. उमेश यादव १८ धावा काढून नाबाद राहिला.
न्यूझीलंडने दिलेल्या २४२ धांवाचा लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव ४९.३ षटकांत २३६ धावांत संपुष्टात आला. आघाडीला फलंदाजीस आलेल्या रोहित शर्मा व अजिंक्य राहणेने पहिल्या विकेटसाठी २१ धावांची भागिदारी केली. त्यानंतर विराट कोहलीने आज सर्वांची निराशा केली. तो ९ धावांवर बाद झाला. नंतर मनिष पांडेने १९ धावा केल्या. कर्णधार महेंद्रसिंह धोनी (३९) व केदार जाधव यांनी पाचव्या विकेटसाठी दमदार फलंदाजी करून धावफलक हलता ठेवला. अक्षर पटेल (१७) यांना मोठी खेळी करता आली नाही. संघातील मुख्य फलंदाज बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्या (३६) व उमेश यादव (नाबाद १८) यांनी आपल्या संघाच्या विजयासाठी प्रयत्न केले पण हार्दीक पांड्या बाद झाल्यानंतर भारताच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. त्यांनी नवव्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. हार्दिक ४९ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर बाद झाला आणि भारताच्या हातून सामना निसटला. न्यूझीलंडकडून टीम सौदीने ५२ धावांत ३, ट्रेन्ट बोल्टने २५ धावांत २ तर मार्टीन गुप्तीलने १ षटकात ६ धावा देत २ विकेट घेतल्या.
त्याआधी, कर्णधार केन विलियम्सनच्या(११८) शतकी खेळीच्या बळावर न्यूझीलंडने अखेरच्या दहा षटकांत धावा खेचून ९ बाद २४२ पर्यंत मजल गाठली. दौऱ्यात पहिल्यांदा लौकिकाला साजेसा खेळ करीत विलियम्सनने १२८ चेंडूंत १४ चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने ११८ धावांचे योगदान दिले. त्याचे करिअरमधील हे
आठवे आणि भारतातील पहिले शतक आहे. त्याने ५० धावा ५६ चेंडूंत आणि शंभर धावा १०९ चेंडूंत पूर्ण केल्या.
केनने दुसऱ्या गड्यासाठी टॉम लेथमसोबत(४६) १२०, तसेच तिसऱ्या विकेटसाठी रॉस टेलरसोबत(२१) ३८ आणि अ‍ॅण्डरसनसोबत(२१) चौथ्या गड्यासाठी ४२ धावांची भागीदारी केली. न्यूझीलंड संघाची आधी ४१ षटकांत ३ बाद २०४ अशी स्थिती होती. लेग स्पिनर अमित मिश्रा व जसप्रीत बुमराह यांनी धावा रोखल्या. मिश्राने ६० धावांत रॉस टेलर, अ‍ॅण्डरसन आणि विलियम्सनला बाद केले. बुमराहने ३५ धावांत तळाच्या डेव्हसिच, टिम साऊदी आणि हेन्री या फलंदाजांना लक्ष्य केले. भारताचा कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतले. वेगवान उमेश यादव याने दुसऱ्या चेंडूवर मार्टिन गुप्तिलची दांडी गूल केली. सातव्या षटकांत यादवने लेथमचा कठीण झेल सोडला. नंतर त्याने ४६ चेंडूंत ४६ धावा केल्या. केदार जाधवने त्याला अखेर पायचीत केले. रॉस टेलर मिश्राच्या चेंडूवर रोहित शर्माकडे झेल देत बाद झाला, तर अ‍ॅण्डरसनला मिश्राने पायचीत केले. डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल याने ल्यूक रोंची याला बाद करीत न्यूझीलंडला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

धावफलक
न्यूझीलंड : मार्टिन गुप्टील त्रि. गो. यादव ००, टॉम लॅथम पायचीत गो. जाधव ४६, केन विलियम्सन झे. रहाणे गो. मिश्रा ११८, रॉस टेलर झे. रोहित गो. मिश्रा २१, कोरी अ‍ॅन्डरसन पायचीत गो. मिश्रा २१, ल्युक रोंची झे. धोनी गो. पटेल ०६, मिशेल सँटनर नाबाद ०९, डेविच झे. पटेल गो. बुमराह ०७, टीम साऊदी त्रि. गो. बुमराह ००, हेन्री त्रि. गो. बुमराह ०६, बोल्ट नाबाद ०५. अवांतर (३). एकूण ५० षटकांत ९ २४२. बाद क्रम : १-०, २-१२०, ३-१५८, ४-२०४, ५-२१३, ६-२१६, ७-२२४, ८-२२५, ९-२३७. गोलंदाजी : उमेश यादव ९-०-४२-१, पंड्या ९-०-४५-०, बुमराह १०-०-३५-३, पटेल १०-०-४९-१, मिश्रा १०-०-६०-३, जाधव २-०-११-१.

भारत : रोहित शर्मा झे राँची गो. बोल्ट १५, अजिंक्य रहाणे झे. अँडरसन गो. साउथी २८, विराट कोहली झे. राँची गो ९, मनीष पांडे धावचीत १९, महेंद्रसिंह धोनी झे. व गो. साउथी ३९, केदार जाधव झे. राँची गो. हेन्री ४१, अक्षर पटेल झे. सँटेनर गो. गुप्टील १७, हार्दिक पंड्या झे. सँटेनर गो. बोल्ट ३६, अमित मिश्रा झे. ब्रासवेल गो. गुप्टील १, उमेश यादव नाबाद १८, जसप्रीत बुमराह गो. साउथी 0. अवांतर १३, एकूण ४९.३ षटकांत सर्व बाद २३६. गडी बाद क्रम : १/२१, २/४0, ३/७२, ४/७३, ५/१३९, ६/१७२, ७/१८0, ८/१८३, ९/२३२, १0/२३६. गोलंदाजी : हेन्री १0-0-५१-१, बोल्ट १0-२-२५-२, साउथी ९.३-0-५२-३, डेवचिच ९-0-४८-0, सँटेनर १0-0-४९-१, गुप्टील १-0-६-२.

Web Title: India defeated in a colorful match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.