अझलान शाह स्पर्धेत भारताने जपानला हरवलं, अंतिम सामन्याच्या आशा पल्लवित
By Admin | Published: May 3, 2017 04:11 PM2017-05-03T16:11:36+5:302017-05-03T16:11:50+5:30
26 व्या सुलतान अझलान शाह हॉकी स्पर्धेत बुधवारी भारताने जपानचा पराभव केला. भारताने जपानचा 4-3 असा पराभव केला.
>
ऑनलाइन लोकमत
इपोह, दि. 3 - 26 व्या सुलतान अझलान शाह हॉकी स्पर्धेत बुधवारी भारताने जपानचा पराभव केला. भारताने जपानचा 4-3 असा पराभव केला. भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो मनदिप सिंग. मनदिपने केलेल्या तीन गोलच्या बळावर पिछाडीवर असतानाही भारताने या सामन्यात विजयी पुनरागमन केलं. भारताकडून पहिला गोल रूपिंदर पाल सिंग याने केला. त्यानंतर मनदिपने गोलची हॅटट्रीक केली.
गेल्या वेळेस अझलान शाह हॉकी स्पर्धेत भारत उपविजेता ठरला होता. त्यावेळी अंतिम सामन्यात 9 वेळेसचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव झाला होता. यंदाच्या स्पर्धेत भारताने 4 सामने खेळले असून त्यापैकी दोन सामन्यात विजया तर एका सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला आहे. याशिवाय ग्रेट ब्रिटनसोबतचा सामना भारताने बरोबरीत सोडवला. जपानवर मिळवलेल्या विजयानंतर अंति सामना खेळण्याच्या भारताच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.