देवधर चषकावर ‘भारत-अ’चे नाव

By admin | Published: January 30, 2016 02:14 AM2016-01-30T02:14:57+5:302016-01-30T02:14:57+5:30

सलामीवीर फैज फैजलची नाबाद शतकी खेळी, मुरली विजय व केदार जाधवच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारत-अ संघाने भारत-ब संघाचा ८७ धावांनी पराभव करीत देवधर चषकावर

'India-A' on Deodhar Trophy | देवधर चषकावर ‘भारत-अ’चे नाव

देवधर चषकावर ‘भारत-अ’चे नाव

Next

कानपूर : सलामीवीर फैज फैजलची नाबाद शतकी खेळी, मुरली विजय व केदार जाधवच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारत-अ संघाने भारत-ब संघाचा ८७ धावांनी पराभव करीत देवधर चषकावर आपले नाव कोरले.
नाणेफेक जिंकून भारत-अ संघाने फलंदाजी स्वीकारली. फैजलने ११२ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांच्या साहाय्याने नाबाद १०० धावांची खेळी केली. त्याला विजयने ९१ चेंडूंत ३ चौकार व तीन षटकार फटकावित ६९ धावांची सुरेख साथ दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १६२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर केदार जाधवने ३९ चेंडूंत ४ चौकार व २ षट्कारांच्या मदतीने ५८ धावांची खेळी करीत संघाला ७ बाद २८६ धावांपर्यंत मजल गाठून दिली. विजयासाठी २८७ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या भारत-ब संघाचा डाव ४०.४ षटकांत १९९ धावांत संपुष्टात आला. सामन्यात एक दोन नव्हे तर चार-पाच जीवनदान मिळाल्यानंतरही फलंदाजांना फायदा उठविता आला नाही. त्यांचा निम्मा संघ ५४ धावांतच तंबूत परतला. स्टुअर्ट बिन्नी (६०) व सुर्यकुमार यादव (४५) यांनीे भारत-ब कडून सर्वाधिक धावा काढून संघाचा पराभव टाळण्याचा अपयशी प्रयत्न केला. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: 'India-A' on Deodhar Trophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.