भारताची स्पेनशी बरोबरी
By admin | Published: July 3, 2016 08:18 PM2016-07-03T20:18:50+5:302016-07-03T20:18:50+5:30
आमंत्रित सहा देशांच्या हॉकी स्पर्धेत भारताने स्पेनसोबत रविवारी झालेल्या सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली आहे.
ऑनलाइन लोकमत
वेलेंशिया : आमंत्रित सहा देशांच्या हॉकी स्पर्धेत भारताने स्पेनसोबत रविवारी झालेल्या सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीचा रौप्यपदक विजेता भारतीय संघाने स्पर्धेतील पाच लीग सामन्यात जर्मनी आणि न्यूझीलंडविरोधातील दोन सामने गमावले, तर आयर्लंडविरोधातील सामन्यात विजय मिळवला. अन्य अर्जेंटिना आणि स्पेन या दोन संघाविरोधातील सामने बरोबरीत सोडवले.
भारताने या सामन्यात सुरुवात उत्तम केली आणि पाचव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला. मात्र स्पेनने या पेनल्टी कॉर्नरचा बचाव केला. स्पेनलाही एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र भारतीय गोलकिपर पी.आर.श्रीजेश याने या पेनल्टी कॉर्नरचा बचाव केला. मात्र भारतीय रक्षक खेळाडूने गोललाईनवर केलेल्या चुकीमुळे स्पेनला स्ट्रोक मिळाला आणि पाओ क्युमादा याने स्पेनला आघाडी मिळवून दिली. भारताने दुसऱ्या क्वार्टरमध्ये स्पेनवर दबाव निर्माण केला. त्याचा फायदा त्यांना १८ व्या मिनिटाला मिळाला. व्ही.आर. रघुनाथ याने गोल करत भारताला बरोबरी साधून दिली. यानंतर दोन्ही संघ संघर्ष करत होते. मात्र यश मिळाले नाही. अंतिम क्षणात भारतीय खेळाडूंनी गोलसाठी उत्तम प्रयत्न केला. मात्र गोलपोस्टला चेंडू लागल्याने भारतीय संघाला विजय मिळू शकला नाही.