भारत पाचव्या स्थानी

By Admin | Published: August 2, 2014 12:17 AM2014-08-02T00:17:24+5:302014-08-02T00:17:24+5:30

पूनम राणी व अनूपा बारलाने नोंदविलेल्या प्रत्येकी एक गोलमुळे भारतीय महिला हॉकी संघाने २०व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पाचव्या व सहाव्या क्रमांकाच्या लढतीत यजमान स्कॉटलंडला २-१ गोलने पराभूत केले.

India fifth place | भारत पाचव्या स्थानी

भारत पाचव्या स्थानी

googlenewsNext

ग्लास्गो : पूनम राणी व अनूपा बारलाने नोंदविलेल्या प्रत्येकी एक गोलमुळे भारतीय महिला हॉकी संघाने २०व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पाचव्या व सहाव्या क्रमांकाच्या लढतीत यजमान स्कॉटलंडला २-१ गोलने पराभूत केले.
भारतीय महिलांचे उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्याचे स्वप्न भंग झाल्यानंतर आज त्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. मध्यंतरापर्यंत सामना गोल शून्य बरोबरीत राहिला. विश्रांतीनंतर भारतीय महिलांनी वेगवान खेळ करण्यास सुरुवात करून आक्रमकतेची धार वाढविली. ५२व्या मिनिटाला भारताच्या बारलाने आपल्या संघाचा पहिला गोल केला. लगेचच दोन मिनिटांनंतर स्कॉटलंडच्या निकीकिडने गोल करून १-१ अशी बरोबरी केली. ६६व्या मिनिटाला स्कॉटलंडच्या सारा रॉबर्टसनला गोल करण्याची चांगली संधी मिळाली होती. पण, गोलरक्षक सविता पूनियाने अफलातून कामगिरी करीत गोल अडवत बरोबरी होण्यापासून आपल्या संघाला वाचविले. (वृत्तसंस्था)

Web Title: India fifth place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.