भारत अंतिम फेरीत
By admin | Published: February 13, 2016 11:29 PM2016-02-13T23:29:41+5:302016-02-13T23:29:41+5:30
भारताच्या अंडर - २३ संघाने बांगलादेशचा ३-० ने पराभव करीत १२व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या फुटबॉल स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. मध्यंतरापर्यंत भारताने २-०
गुवाहाटी : भारताच्या अंडर - २३ संघाने बांगलादेशचा ३-० ने पराभव करीत १२व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या फुटबॉल स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. मध्यंतरापर्यंत भारताने २-० अशी आघाडी घेतली होती. उदांता सिंगने २२व्या मिनिटाला भारताला आघाडी मिळवून दिली. मध्यंतराला ५ मिनिटांचा अवधी शिल्लक असताना माविहमिंगथांगाने चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखवीत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात जयेश राणेने ६५व्या मिनिटाला गोल नोंदवला.
भारताचे मुख्य प्रशिक्षक
ली जॉन्सन प्रतिक्रिया देताना म्हणाले, ‘‘बचाव फळी व मिडफिल्डरची कामगिरी उल्लेखनीय ठरली. बांगलादेशने चेंडूवर नियंत्रण राखले होते, पण त्यांना आमचा बचाव भेदता आला नाही.’’ अंतिम लढत १५ फेब्रुवारी रोजी खेळल्या जाणार आहे. महिला संघाने बांगलादेशवर ५-१ ने मात केली.