भारताला अखेर ‘रौप्य’ समाधान
By Admin | Published: June 18, 2016 02:27 AM2016-06-18T02:27:03+5:302016-06-18T03:12:37+5:30
चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच धडक मारलेल्या भारतीय संघाला पेनल्टी शूटआऊटमध्ये जगजेत्त्या ऑस्ट्रेलियाकडून चुरशीच्या झालेल्या लढतीत १-३ असा
>चॅम्पियन्स ट्रॉफी : पेनल्टी शुटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाचा ३-१ विजय
लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच धडक मारलेल्या भारतीय संघाला पेनल्टी शूटआऊटमध्ये जगजेत्त्या ऑस्ट्रेलियाकडून चुरशीच्या झालेल्या लढतीत १-३ असा पराभव पत्करावा लागला. यामुळे पहिल्यांदा ‘चॅम्पियन’ बनण्याचे भारताचे स्वप्न धुळीस मिळाले.
संपुर्ण सामन्यात जबरदस्त बचावाच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला चांगलेच झुंजवले. यावेळी ऑस्ट्रेलियाने त्यांच्या नेहमीच्या आक्रमक खेळाच्या जोरावर गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी कमालीचे बचाव करताना भारताने ऑस्ट्रेलियाला संघाला गोल करण्यापासून रोखले. दरम्यान, भारताचा गोलरक्षक पी. श्रीजेश याने केलेल्या निर्णायक बचावाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या सर्व योजना अपयशी ठरल्या. निर्धारीत वेळेत सामना गोलशुन्य बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टी शूटआऊट खेळविण्याचा निर्णय झाला आणि येथेच दडपणाखाली आलेल्या भारतीयांच्या हातातील जेतेपद निसटले.
ऑस्ट्रेलियाकडून डॅनिएल बेले, सिमॉन आॅर्चर्ड आणि अरन झलेवस्की यांनी निर्णायक गोल केले. तर भारताकडून एकमेव गोल हरमनप्रीत सिंग याने केला.
सहा देशांच्या राऊंड रॉबिन स्पर्धेला १९७८ मध्ये प्रारंभ झाल्यानंतर भारताने प्रथमच अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी केली. भारताने आतापर्यंत केवळ १९८२ च्या अॅमस्टर्डम स्पर्धेत कांस्यपदकाचा मान मिळवलेला होता. या स्पर्धेत भारताला ७ वेळा चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. गुरुवारी रात्री उशिरा ब्रिटन आणि बेल्जियम यांच्यादरम्यानची लढती ३-३ गोल बरोबरीत संपल्यामुळे भारतीय संघसाठी अंतिम फेरीचे दार उघडले होते.
अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या भारताला ब्रिटनचे आभार व्यक्त करायला हवे. कारण, दोन गोलने पिछाडीवर पडल्यानंतर अखेरच्या साखळी लढतीत ब्रिटनने बेल्जियमला ३-३ ने बरोबरीत रोखले. भारताला गुणांच्या आधारावर पिछाडीवर सोडण्यासाठी ब्रिटनला विजय आवश्यक होता, तर बेल्जियमला तीन गोलच्या फरकाने विजय मिळवणे गरजेचे होते.
ब्रिटन आणि बेल्जियम लढत अनिर्णित संपल्यामुळे हे दोन्ही संघ राऊंड रॉबिन लीगमध्ये भारतापेक्षा पिछाडीवर राहिले. त्यामुळे भारताला आज खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीत संधी मिळाली. सर्व तिन्ही गोल अखेरच्या क्वार्टरमध्ये नोंदवल्या गेल्यामुळे भारतीय चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले होते.
सामना संपायला पाच सेकंदाचा अवधी शिल्लक असताना ब्रिटनतर्फे गोल नोंद झाली असती, तर यजमान संघ अंतिम फेरीत दाखल झाला असता. त्यापूर्वी भारताला अखेरच्या साखळी लढतीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध २-४ ने पराभव स्वीकारावा
लागला. कांस्यपदकाच्या लढतीत जर्मनीने ग्रेट ब्रिटनला १-० ने पराभूत केले. (वृत्तसंस्था)