अखेर भारत जिंकला...
By admin | Published: June 24, 2015 11:40 PM2015-06-24T23:40:58+5:302015-06-25T16:47:33+5:30
सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या अर्धशतकी खेळीमुळे मोठी धावसंख्या उभारणाºया भारतीय संघाने बुधवारी तिसºया आणि अखेरच्या
मिरपूर : सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या अर्धशतकी खेळीमुळे मोठी धावसंख्या उभारणाºया भारतीय संघाने बुधवारी तिसºया आणि अखेरच्या वन डेत ७७ धावांनी विजय विजय मिळवित तीन सामन्यांच्या मालिकेत ‘क्लीन स्विप’ करण्याच्या बांगला देशच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. धवनने ७३ चेंडूत दहा चौकारांसह ७५ आणि धोनीने ७७ चेंडूत ६९ धावा ठोकल्या. अंबाती रायुडूच्या ४९ चेंडूतील ४४ व सुरेश रैनाच्या २१ चेंडूतील ३८ धावांमुळे भारताने ५० षटकांत ६ बाद ३१७ पर्यंत मजल गाठली. मोठे लक्ष्य गाठताना बांगला देश संघ दडपणात आला. नियमित फरकाने त्यांचे फलंदाज बाद होताच संपूर्ण संघ ४७ षटकांत २४० धावांत गारद झाला. शब्बीर रहमान (४३), सौम्या सरकार (४०), लिट्टन दास (३४), नासिर हुसेन (३२) यांनी चांगली सुरुवात केली पण दडपणात त्यांनीही गुडघे टेकले. सुरेश रैनाने ४५ धावा देत तीन, तसेच धवल कुलकर्णी आणि अश्विन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. या पराभवामुळे बांगला देशच्या सलग दहा विजयाच्या मोहिमेला देखील विराम मिळाला. सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून त्यांनी मालिका जिंकली होती. या दोन्ही सामन्यात मुस्तफिजूर रहमान हा विजयाचा नायक ठरला. आज त्याने ५७ धावा देत दोन गडी बाद केले. मालिकेत त्याने एकूण १३ बळी घेतले आहेत. विजयासाठी ३१८ धावाचे आव्हाने बांगलादेशला पेलवले नाही. धवल कुलकर्णी , आर. आश्विन आणि सुरेश रैना यांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांना तारेवरची कसरत करायला भाग पाडले. धवल कुलकर्णीने दुसºयाच षटकात तमीम इक्बालला बाद करून धक्का दिला. नंतर धवलने दहाव्या षटकात सौम्य सरकारला ४० धावांवर बाद केले. तेव्हा बांगलादेशाच्या २ बाद ६२ धावा झाल्या होत्या. नंतर अक्षर पटेलने दासला ३४, तर रैनाने मुशफिकुर रहिमला अनुक्रमे २४ व २० धावांवर बाद केले. ३३ व्या षटकात बिन्नीने शब्बीर रहमानला ४३ धावांवर त्रिफळाबाद करुन तंबूत परताविला. नासीर हुसेनला आश्विनने ३२ धावांवर बाद केले. नंतर मूर्तजा (०), रुबेल हुसेन (२) आणि मुस्तफिजूर रहमान (९) जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू शकले नाही. शेर-ए-बांगला स्टेडियमच्या मैदानावर झालेल्या या लढतीत नाणेफेक जिंकून बांगलादेशाचा कर्णधार मशरफी मुर्तजाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्या झंझावाताच्या बळावर भारताने ६ बाद ३१७ धावा उभारल्या. धवनने ७३ चेंडू टोलवीत १० चौकारांसह ७५ आणि धोनीने ७७ चेंडूंत ६९ धावा ठोकल्या. कर्णधाराने अंबाती रायुडूसोबत(४९ चेंडू, ४४ धावा) चौथ्या गड्यासाठी ९३ धावांची भागीदारी केली. सुरेश रैनाने डावाच्या अखेरीस २१ चेंडूंत ३८ धावा कुटल्या. दोन्ही सामन्यांत बांगलादेशच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या मुस्तफिजूरने आज ५७ धावांत दोन व कर्णधार मूर्तझाने ७६ धावा देत तीन गडी बाद केले. मुस्तफिजूरचे मालिकेत १३ बळी झाले. ढगाळ वातावरणामुळे बांगलादेशने नाणेफेक जिंकताच भारताला फलंदाजी दिली. खेळपट्टी मंद होती आणि त्यावर भेगाही पडल्या होत्या. सलामीवीरांना बांगलादेशच्या वेगवान माºयापुढे सुरुवातीला दडपणाचा सामना करावा लागला. मूर्तझाने आखूड टप्प्याचे चेंडू टाकून धवनला त्रस्त केले. मुस्तफिजूरच्या कटरपुढेदेखील भारतीय फलंदाजांची भंबेरी उडाली. मुस्तफिजूरने रोहित शर्मा (२९) याला यष्टिमागे झेलबाद केले. मालिकेत तिसºयांदा मुस्तफिजूरने रोहितला बाद केले. भारतीयांनी यानंतर सावध पवित्रा अवलंबला. विराट कोहलीने ३५ चेंडूंवर २५ धावा केल्या. शाकीबच्या चेंडूवर स्विप करण्याच्या नादात त्याची दांडी गुल झाली. धवनसोबत त्याने ७५ धावांची भागीदारी केली. धोनी चौथ्या स्थानावर फलंदाजीला आला. त्याने नासिर हुसेनला लागोपाठ चौकार आणि षटकार खेचला; पण दुसºया टोकावर धवन बाद झाला. मूर्तझाने त्याला बाद केले. पण बाद करण्याचे खरे श्रेय नासिर हुसेनला जाते. मिडविकेटवर त्याने धवनचा सुरेख झेल टिपला. धोनीने या दरम्यान चौथ्या स्थानावर फलंदाजी करीत एक हजार धावा पूर्ण केल्या. काही वेळातच त्याने स्वत:चे ५९ वे अर्धशतकही गाठले. रायडूला मात्र नशिबाची साथ मिळू शकली नाही. तो अर्धशतकाकडे वाटचाल करीत असताना, पंचाने त्याला यष्टिमागे झेलबाद दिले. रिप्लेत चेंडूचा बॅटस्शी स्पर्श झाल्याचे दिसत नव्हते. रायडूदेखील पंचाच्या निर्णयावर नाखूश होता. मूर्तझाच्या पुढच्या षटकांत धोनीने मिडविकेटवर मुस्तफिजूरकडे झेल दिला. कर्णधाराने सहा चौकार आणि एक षटकार मारला. रैना आणि स्टुअर्ट बिन्नी (नाबाद १७) यांनी संघाला ३०० चा पल्ला गाठून दिला. मुस्तफिजूरने रैनाचा त्रिफळा उडवीत स्वत:चा दुसरा बळी घेतला. अक्षर पटेल १० धावांवर नाबाद राहिला.(वृत्तसंस्था) धावफलक : भारत : रोहित शर्मा झे. लिट्टन गो. मुस्तफिजूर रहमान २९, शिखर धवन झे. नासिर हुसेन गो. मुशरफी मूर्तझा ७५, विराट कोहली त्रि. गो. शाकिब २५, महेंद्रसिंग धोनी झे. मुस्तफिजूर गो. मूर्तझा ६९, अंबाती रायुडू झे. लिट्टन गो. मूर्तझा ४४, सुरेश रैना त्रि. गो. मुस्तफिजूर ३८, स्टुअर्ट बिन्नी नाबाद १७, अक्षर पटेल नाबाद १०, अवांतर १०, एकूण : ५० षटकांत ६ बाद ३१७ धावा. गडी बाद क्रम : १/३९, २/११४, ३/१५८, ४/२५१, ५/२६८, ६/३०१. गोलंदाजी : मुस्तफिजूर रहमान १०-०-५७-२, मशरेफी मूर्तझा १०-०-७६-३, अराफात सनी ६-०-४२-०, रुबेल हुसेन ९-०-७५-०, नासिर हुसेन ६-०-२७-०, शाकिब अल हसन ९-१-३३-१. बांगलादेश : तमीम इक्बल पायचीत गो. कुलकर्णी ५, सौम्य सरकार झे. आश्विन गो. कुलकर्णी ४०, लिट्टन दास त्रि. गो. पटेल ३४, मुशफिकुर रहीम झे. धोनी गो. रैना २४, शाकिब-अल-हसन झे. कुलकर्णी गो. रैना २०, शब्बीर रहमान त्रि. गो. बिन्नी ४३, नासीर हुसेन झे. रायडू गो. आश्विन ३२, मशरफी मुर्तजा त्रि. गो. आश्विन ०, अराफत सनी नाबाद १४, रुबेल हुसेन झे. पटेल गो. रैना २, मुस्तफिजूर रहमान पायचीत गो. रायडू ९; अवांतर : १७; एकूण : ४७ षटकात सर्व बाद २४०; गडी बाद होण्याचा क्रम : १/८, २/६२, ३/११२, ४/११८, ५/१४८, ६/१९७, ७/२०५, ८/२१६, ९/२२२. गोलंदाजी : स्टुअर्ट बिन्नी ६-०-४१-१, धवल कुलकर्णी ८-०-३४-२, उमेश यादव ४-०-३३-०, आर. आश्विन १०-१-३५-२, अक्षर पटेल ९-१-४४-१, सुरेश रैना ८-०-४५-३, अंबाती रायडू २-१-५-१.