भारताला करावी लागणार सर्वोत्तम कामगिरी
By admin | Published: May 21, 2017 01:10 AM2017-05-21T01:10:30+5:302017-05-21T01:10:30+5:30
आॅलिम्पिक रौप्यपदक प्राप्त पी. व्ही. सिंधू हिच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला उद्या येथे सुरू होणाऱ्या सुदीरमन चषक बॅडमिंटन स्पर्धेत पदक जिंकण्यासाठी
- सुदीरमन चषक बॅडमिंटन
गोल्ड कोस्ट : आॅलिम्पिक रौप्यपदक प्राप्त पी. व्ही. सिंधू हिच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला उद्या येथे सुरू होणाऱ्या सुदीरमन चषक बॅडमिंटन स्पर्धेत पदक जिंकण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे.
नववे रँकिंग असणारा भारतीय संघ २0११ मध्ये नॉकआऊटमध्ये पोहोचला होता तर गेल्या दोन हंगामांत मात्र ते साखळी फेरीतून पुढे जाऊ शकले नव्हते. सिंधू आणि जागतिक क्रमवारीतील १३ व्या मानांकित अजय जयराम यांच्या नेतृत्वाखालील भारताला या वेळेस ड गट मिळाला आहे. त्यात डेन्मार्क आणि इंडोनेशियाचा समावेश आहे.
भारताला सोमवारी डेन्मार्क संघाविरुद्ध खेळावे लागणार आहे. बुधवारी त्यांचा सामना माजी चॅम्पियन आणि सहा वेळेसचा उपविजेता इंडोनेशियाशी होईल. लंडन आॅलिम्पिक कास्यपदक प्राप्त सायना नेहवाल या स्पर्धेत खेळणार नाही. सिंधू म्हणाली, ‘‘ही सांघिक स्पर्धा आहे. त्यात मुले आणि मुली या दोघांनाही चांगले खेळावे लागणार असल्याने आमच्याकडे चांगली संधी आहे. (वृत्तसंस्था)