भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी : ब्रेट ली

By admin | Published: June 9, 2017 04:11 AM2017-06-09T04:11:52+5:302017-06-09T04:11:52+5:30

भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद कायम राखण्याची चांगली संधी असल्याचे मत आॅस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने व्यक्त केले

India has the chance to win the Champions Trophy: Brett Lee | भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी : ब्रेट ली

भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी : ब्रेट ली

Next

मुंबई : संतुलित संघ बांधणीमुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद कायम राखण्याची चांगली संधी असल्याचे मत आॅस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने व्यक्त केले आहे. एका सामाजिक कार्यक्रमात सहभागी झालेला ली म्हणाला,‘चॅम्पियन्स ट्रॉफीत आतापर्यंतचे सामने चांगले झाले. भारताला मी वर्चस्व प्रस्थापित करताना पाहिले आहे. भारताकडे स्पर्धा जिंकण्याची चांगली संधी आहे पण माझ्या देशाला (आॅस्ट्रेलिया) देखील स्पर्धा जिंकण्याची संधी असेल. ’ भारताने ४ जून रोजी पाकवर एकतर्फी विजयाची नोंद केली. संघाचे संतुलन आणि फलंदाजी- गोलंदाजीतील भक्कमपणा या बळावर भारतीय संघ स्पर्धा जिंकू शकतो. अ गटात असलेल्या आॅस्ट्रेलियाचे दोन्ही सामने पावसात वाहून गेल्याने हा संघ केवळ दोन गुण मिळवित उपांत्य फेरीसाठी धडपड करीत आहे. आॅस्ट्रेलिया संघाची निराशा झाल्याचे सांगून उपांत्य फेरीत धडक देण्यासाठी यजमान इंग्लंडला नमविण्याचे आव्हान आॅस्ट्रेलियाला लीलया पेलायचे असल्याचे लीने सांगितले.(वृत्तसंस्था)

Web Title: India has the chance to win the Champions Trophy: Brett Lee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.