भारताने आॅस्ट्रेलियाला रोखले
By admin | Published: April 15, 2015 01:14 AM2015-04-15T01:14:58+5:302015-04-15T01:14:58+5:30
सलग दोन पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाने मंगळवारी हॉक बे कप स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना आॅस्ट्रेलियाला गोलशून्यने बरोबरीत रोखले.
हॅस्टिग्स : सलग दोन पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाने मंगळवारी हॉक बे कप स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना आॅस्ट्रेलियाला गोलशून्यने बरोबरीत रोखले.
भारताला या स्पर्धेत सुरुवातीला चीन व अमेरिका या संघांविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. मात्र आज भारताने आॅस्ट्रेलियाला बरोबरीत रोखत गुणाचे खाते उघडले. आॅस्ट्रेलियाने या अनिर्णित निकालासह ‘ड्रॉ’ची हॅट््ट्रिक केली.
भारत व आॅस्ट्रेलिया संघांदरम्यानच्या लढतीत उभय संघांनी सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला, पण दोन्ही संघांची बचाव फळी उत्तम असल्यामुळे गोलफलक कोराच राहिला. भारतीय गोलकीपरने चांगला बचाव करीत आॅस्ट्रेलियाचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. आॅस्ट्रेलियाने पहिल्या क्वार्टरमध्ये पेनल्टी कॉर्नर मिळवला होता, पण भारतीय बचावपटूंनी चांगला बचाव केला. पहिला क्वार्टर संपयाला काही सेकंदाचा अवधी शिल्लक असताना आॅस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण भारतीय गोलकीपरने त्यांचे आक्रमन परतावून लावले.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताच्या अनुराधा थोकचोमला आॅस्ट्रेलियन डीमध्ये नियमबाह्य पद्धतीने रोखण्यात आले. भारताला पेनल्टी स्ट्रोक बहाल करण्यात आला, पण आॅस्ट्रेलियन गोलकिपरने शानदार बचाव केल्यामुळे भारताचे आघाडी घेण्याचे स्वप्न भंगले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण त्यावर गोल नोंदविण्यात भारतीय संघ अपयशी ठरला. भारताला यानंतर १६ एप्रिल रोजी न्यूझीलंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ही लढत भारतीय वेळेनुसार सकाळी ११.३० वाजता प्रारंभ होईल. (वृत्तसंस्था)
भारताचा बचाव
भारत व आॅस्ट्रेलिया संघांदरम्यानच्या लढतीत उभय संघांनी सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला़ पण दोन्ही संघांची बचाव फळी उत्तम असल्यामुळे गोलफलक कोराच राहिला. भारतीय गोलकीपरने चांगला बचाव करीत आॅस्ट्रेलियाचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. आॅस्ट्रेलियाने पहिल्या क्वार्टरमध्ये पेनल्टी कॉर्नर मिळवला होता, पण भारतीय बचावपटूंनी चांगला बचाव केला.