पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचा हाॅकी संघ जाहीर; हरमनप्रीत सिंग कर्णधार; हार्दिक उपकर्णधार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 06:56 AM2024-06-27T06:56:06+5:302024-06-27T06:56:13+5:30
हाॅकी इंडियाने पुढील महिन्यात होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी बुधवारी १६ सदस्यीय संघाची घोषणा केली.
नवी दिल्ली : हाॅकी इंडियाने पुढील महिन्यात होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी बुधवारी १६ सदस्यीय संघाची घोषणा केली. या संघाचे नेतृत्व हरमनप्रीत सिंगकडे तर, हार्दिक सिंगकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भारतीय संघात पाच खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करतील. मागील ऑलिम्पिकमध्ये सहभागी असलेल्या काही वरिष्ठ खेळाडूंचाही संघात समावेश आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाला गतविजेते बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, न्यूझीलंड आणि आयर्लंड यांच्यासह ‘बी’ गटात स्थान मिळाले आहे.
भारतीय संघ :
गोलरक्षक : पी. आर. श्रीजेश. बचावपटू : जरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग, सुमित, संजय.
मध्यरक्षक : राजकुमार पाल, शमशेर सिंग, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद. आक्रमक : अभिषेक, सुखजीत सिंग, ललित कुमार उपाध्याय, मंदीप सिंग, गुरजंत सिंग.