भारतात होणार पुरुष व महिला बॉक्सिंग विश्व चॅम्पियनशिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 03:02 AM2017-07-26T03:02:33+5:302017-07-28T13:06:39+5:30

भारत पुढील वर्षी महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपव्यतिरिक्त २०२१ मध्ये प्रथमच पुरुषांच्या विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे यजमानपद भूषविणार आहे

India to host men's World Boxing Championship in 2021 | भारतात होणार पुरुष व महिला बॉक्सिंग विश्व चॅम्पियनशिप

भारतात होणार पुरुष व महिला बॉक्सिंग विश्व चॅम्पियनशिप

Next

नवी दिल्ली : भारत पुढील वर्षी महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपव्यतिरिक्त २०२१ मध्ये प्रथमच पुरुषांच्या विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे यजमानपद भूषविणार आहे. एक वेळ प्रशासकीय अडचणीत सापडलेल्या बॉक्सिंग या खेळासाठी ही मोठी उपलब्धी आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (एआयबीए) मॉस्कोमध्ये आपल्या कार्यकारी समितीच्या २ दिवसांच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. या वृत्तामुळे भारतीय बॉक्सिंगसोबत जुळलेल्या लोकांनी अपेक्षेप्रमाणे आनंद व्यक्त करताना या खेळासाठी ही नव्या युगाची सुरुवात असल्याचे म्हटले आहे.
डॉ. चिंग कुआ म्हणाले, ‘‘तुर्की बॉक्सिंग महासंघाच्या प्रस्तावानंतर ट्राबजोन २०१९ मध्ये जगातील सर्वांत प्रतिष्ठेच्या महिला बॉक्सिंग स्पर्धेचे यजमानपद भूषविण्यास सज्ज राहील.’’
भारताने यापूर्वी कधीच पुरुष विश्व चॅम्पियनशिपचे यजमानपद भूषविलेले नाही; पण २००६ मध्ये महिला चॅम्पियनशिपचे आयोजन केलेले आहे. भारताने यापूर्वी पुरुष बॉक्सिंगमध्ये १९९० मध्ये मुंबईत विश्वकप व २०१० मध्ये दिल्ली येथे राष्ट्रकुल चॅम्पियनशिप या प्रमुख स्पर्धांचे आयोजन केलेले आहे.
भारतीय बॉक्सिंग महासंघावर प्रशासकीय गोंधळामुळे २०१२ ते २०१६ या कालावधीत निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर, या दोन प्रतिष्ठेच्या स्पर्धांचे यजमानपद मिळणे महत्त्वाचे मानले जात आहे.
क्रीडामंत्री विजय गोयल यांनी टिष्ट्वट केले, ‘भारतीय बॉक्सिंग चाहते व खेळाडूंसाठी आनंदाचे वृत्त.’
एआयबीए कार्यकारी समितीने २०१९ च्या महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे यजमानपद तुर्कीतील ट्राबजोनला बहाल केले आहे. एआयबीए २०१८ काँग्रेस रशियातील मॉस्कोमध्ये होईल.
या वृत्तामुळे भारतीय बॉक्सिंग वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. यंदा होणाºया विश्व चॅम्पियनशिपसाठी निवड झालेल्या संघातील खेळाडूंसोबत फ्रान्स दौºयावर असलेले भारतीय पुरुष संघाचे प्रशिक्षक सँटियागो नीवा यांनी दोन स्पर्धांचे यजमानपद मिळणे ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे.
भारताने पुरुष बॉक्सिंगमध्ये एकूण ३ पदके पटकावली आहेत. ही तिन्ही कांस्यपदके आहेत. पदकविजेत्या भारतीय बॉक्सरमध्ये विजेंदरसिंग (२००९), विकास कृष्णा (२०११) आणि शिव थापा (२०१५) यांचा समावेश आहे.
महिला बॉक्सिंगचे मुख्य प्रशिक्षक गुरबक्षसिंग यांनी आनंद व्यक्त केला आहे.
संधू म्हणाले, ‘‘मी आज सकाळीच हे वृत्त खेळाडूंना दिले, त्यामुळे त्या उत्साहित होत्या. भारतीय बॉक्सिंग महासंघाने भारतासाठी प्रतिष्ठेच्या स्पर्धांचे यजमानपद मिळविले आहे. अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी खेळाडूंवर आहे.’’
पाच वेळा विश्व चॅम्पियन व आॅलिम्पिक पदकविजेती एम. सी. मेरी कोम हिने या वृत्तानंतर २००६ च्या आठवणींना उजाळा दिला. त्या वेळी तिने ४६ किलोगटात सुवर्णपदक पटकावले होते. आता ४८ व ५१ किलो गटांत खेळणारी मेरी कोम म्हणाली, ‘‘भारतासाठी हे आनंदाचे वृत्त आहे. जर फिटनेस राखता आला, तर ४८ किलो गटात सहभागी होईन. यामुळे माझ्या अनेक आठवणी ताज्या झाल्या. २००६ मध्ये पटकावलेल्या सुवर्णपदकाचा क्षण मी कधीच विसरू शकत नाही.’’ (वृत्तसंस्था)

एआयबीएचे अध्यक्ष डॉ. चिंग कुआ म्हणाले, ‘‘एआयबीए पुरुष विश्व चॅम्पियनशिप २०१९ मध्ये सोच्ची येथे होणार असून नवी दिल्ली येथे २०१२ च्या चॅम्पियनशिपचे यजमानपद बहाल करताना आनंद होत आहे. कारण भारतीय बॉक्सिंग महासंघाने खेळाच्या विकासासाठी आपली प्रतिबद्धता कायम राखली आहे.’’नीवा म्हणाले, ‘‘भारतीय बॉक्सिंगसाठी हे शानदार आणि निश्चितच ऐतिहासिक वृत्त आहे. यामुळे महासंघाची ताकद व संकल्प याची कल्पना येते. या स्पर्धांचे यजमानपद मिळविणे भारतीय बॉक्सिंगच्या भविष्यासाठी निश्चितच महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठी बॉक्सर अधिक मेहनत घेतील.’’भारताला प्रथमच दोन महत्त्वाच्या चॅम्पियनशिपचे यजमानपद मिळालेले आहे. आमच्या प्रस्तावाला एआयबीएच्या अध्यक्षांनी सर्वोत्तम असल्याचे म्हटले आहे. - अजयसिंग,
अध्यक्ष, भारतीय बॉक्सिंग महासंघ

Web Title: India to host men's World Boxing Championship in 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.