२० वर्षांखालील विश्वचषक यजमानपदासाठी भारत उत्सुक
By admin | Published: July 5, 2017 01:33 AM2017-07-05T01:33:33+5:302017-07-05T01:33:33+5:30
आगामी १७ वर्षांखालील फिफा फुटबॉल विश्वचषकची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना भारताने आता २०१९ साली होत असलेल्या
नवी दिल्ली : आगामी १७ वर्षांखालील फिफा फुटबॉल विश्वचषकची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना भारताने आता २०१९ साली होत असलेल्या २० वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेच्या यजमानपदासाठीही आपण इच्छुक असल्याचे फिफाला कळविले.
या वर्षाच्या अंतिम टप्प्यात भारतात १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा धडाका रंगणार आहे. याबाबत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, ‘भारतातील फुटबॉल प्रगतीच्या दृष्टीने टाकलेले हे आणखी एक पुढचे पाऊल असेल. यंदा आॅक्टोबरमध्ये भारतात १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक होत आहे. शिवाय भारतातील फुटबॉल अभियान कायम राखण्यासाठी २० वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद उत्तम मार्ग ठरेल, असा आमचा विश्वास आहे.’ ‘ही स्पर्धा याआधी या वर्षाच्या सुरुवातीला आशियामध्ये कोरिया प्रजासत्ताकमध्ये आयोजित करण्यात आली होती. परंतु, २०१९ मध्ये या स्पर्धेचे भारतात आयोजन करण्याबाबत फिफाशी आम्ही आनंदाने चर्चा करण्यास तयार आहोत,’ असेही पटेल यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)