भारताकडे २४६ धावांची आघाडी, वेस्ट इंडिज १ बाद १०७

By admin | Published: August 11, 2016 06:03 AM2016-08-11T06:03:39+5:302016-08-11T06:03:39+5:30

भारताने दिलेल्या ३५३ धावाचा पाठलाग करताना यजमानांनी संयमी फलंदाजी केली. ४७ षटकात १ बाद १०७ धावा केल्या.

India lead by 246 runs, the West Indies 107 for one | भारताकडे २४६ धावांची आघाडी, वेस्ट इंडिज १ बाद १०७

भारताकडे २४६ धावांची आघाडी, वेस्ट इंडिज १ बाद १०७

Next

ऑनलाइन लोकमत
सेंट लुसिया, दि. ११ : प्रमुख फलंदाजांनी निराशा केल्यानंतर अश्विन-साहा यांनी सहाव्या विकेटसाठी २१३ धावांची निर्णायक भागीदारी करत भारताला सावरले. पहिल्या डावात भारताने सर्वबाद ३५३ धावा केल्या. भारताने दिलेल्या ३५३ धावाचा पाठलाग करताना यजमानांनी संयमी फलंदाजी केली. ४७ षटकात १ बाद १०७ धावा केल्या. ब्रेथवेट ५३ तर ब्रावो १८ धावावर खेळत आहेत. राहुलने जॉन्सनला धावबाद करत भारताला एकमात्र यश मिळवून दिले. दरम्यान, आघाडीची फळी ढेपाळल्यानंतर अष्टपैलू रविचंद्रन अश्विन (११८) आणि यष्टीरक्षक वृध्दिमान साहा (१०४) यांच्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३५३ धावा उभारल्या.

डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी यजमानांनी भारताचे आघाडीचे ५ फलंदाज बाद केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रापर्यंत अश्विन - साहा यांनी त्यांना बळी घेण्यापासून रोखले. ५ बाद २३४ या धावसंख्येपासून सुरुवात करताना या जोडिने पहिल्या सत्रात ८२ धावांची भर टाकली. पहिल्या दिवसाच्या तुलनेत अधिक आत्मविश्वासाने खेळताना अश्विन - साहा जोडिने दमदार खेळ करताना यजमानांचा चांगलाच सामाचार घेतला.

अश्विनने २९७ चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकार व एका षटकारासह दमदार ११८ धावांची संयमी आणि निर्णायक खेळी केली आहे. तर त्याला मोलाची साथ दणाऱ्या साहाने २२७ चेंडूत १३ चौकारांसह १०४ धावा फटकावल्या. अल्झारी जोसेफने साहाला बाद करुन ही जोडी फोडली. यानंतर अवघ्या १४ धावांत ४ बळी गेल्याने भारताचा डाव संपुष्टात आला. अष्टपैलू रविंद्र जडेजा (६) झटपट परतल्यानंतर भुवनेश्वर कुमार व इशांत शर्मा खेळपट्टीवर हजेरी लावून गेले. तर मिग्युएल कमिन्सने अश्विनला बाद केले.

सामन्यादरम्यान झालेले विक्रम -
- विदेशामध्ये भारताकडून सहाव्या विकेटसाठी अश्विन - साहा यांनी केलेली सर्वोत्तम तिसरी भागीदारी.
- विंडिज विरुध्द चार किंवा त्याहून अधिक शतक झळकावणारा अश्विन भारताचा सहावा फलंदाज.
- विदेशात शतक झळकावणारा साहा चौथा भारतीय यष्टीरक्षक.
-पहिल्यांदाचा एकाच कसोटी डावात भारताच्या सहाव्या व सातव्या क्रमांकावरील फलदाजांनी शतकी खेळी केली.
- एकाच मालिकेत दोनहून अधिक ५० हून धावा आणि २ हून अधिक वेळा डावात ५ बळी अशी कामगिरी केलेला अश्विन केवळ    तिसरा भारतीय.
- कसोटी क्रिकेटमध्ये सलामी गोलंदाजी करणारा अलझारी जोसेफ वेस्ट इंडिजचा सर्वात युवा गोलंदाज ठरला.

Web Title: India lead by 246 runs, the West Indies 107 for one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.