भारत १ बाद ७०, १५७ धावांची आघाडी
By admin | Published: August 22, 2015 04:02 PM2015-08-22T16:02:28+5:302015-08-22T18:22:20+5:30
श्रीलंकेविरुद्धच्या दुस-या कसोटीत भारताने दुस-या डावात १ गडी गमावून ७० धावा करत एकूण १५७ धावांची आघाडी घेतली आहे.
ऑनलाइन लोकमत
कोलंबो, दि. २२ - श्रीलंकेविरुद्धच्या दुस-या कसोटीत भारताने दुस-या डावात १ गडी गमावून ७० धावा करत एकूण १५७ धावांची आघाडी घेतली आहे. मुरली विजय (३९) व अजिंक्य रहाणे (२८) खेळत असून के. एल. राहुल अवघ्या २ धावा काढून बाद झाला.
तत्पूर्वी श्रीलंकेचा पहिला डाव ३०६ धावांत आटोपल्याने भारताला ८७ धावांची आघाडी मिळाली. कर्णधार अँजलो मॅथ्यूजचे (१०२) शतक व थिरीमने (६२) आणि सिल्व्हा (५१) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेने ३०० धावांचा टप्पा पार केला. मात्र त्यांचे सर्व फलंदाज अकेर ३०६ धावांत तंबूत परतले. भारतातर्फे मिश्राने ४ तर इशांत शर्मा व अश्विनने २ आणि यादव, बिन्नीने प्रत्येकी १ बळी टिपला