शेवटच्या कसोटीत भारत पराभूत

By admin | Published: August 17, 2014 09:29 PM2014-08-17T21:29:03+5:302014-08-17T21:29:03+5:30

भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी सामन्यातील पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत भारताचा आज दारूण पराभव झाला आहे.

India lost in the last Test | शेवटच्या कसोटीत भारत पराभूत

शेवटच्या कसोटीत भारत पराभूत

Next

ऑनलाइन टीम
ओव्हल,दि. १७ - भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी सामन्यातील पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत भारताचा आज दारूण पराभव झाला आहे. अवघ्या ९४ धावांवर भारताचे सर्व गडी बाद झाले असून कर्णधार महेंद्र सिग धोनीला भोपळाही न फोडता आल्याने भारतीय क्रिकेट रसिंकांची घोर निराशा झाली आहे. या मालिकेत सामना वीर म्हणून इंग्लंडचा खेळाडू जॉ रुट यास गौरवण्यात आले असून मालिका वीर म्हणून जिमी अँडरसनला गौरवण्यात आले आहे. भारतीय संघात भुवनेश्वर कुमारला मालिका वीर म्हणून गौरवण्यात आले आहे.
भारतीय संघात सर्वाधीक म्हणजेच स्टुअर्ट बिनीने फक्त २५ धावा केल्या आहेत. तर, कोहलीलाही आपल्या खेळाचे विराट दर्शन करता आले नाही. अवघ्या २० धावांवर झेल गेल्याने तो तंबुत परतला. ख्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीसमोर भारतीय गोलंदाजांचा टिकाव लागला नाही. विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, आ. अश्वीन व इशांत शर्मा या सर्वांना तंबूचा रस्ता दाखवण्यात जॉर्डन यशस्वी झाला.

Web Title: India lost in the last Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.