भारताने विंडीजला १४३ धावांत गुंडाळले
By Admin | Published: August 28, 2016 10:08 PM2016-08-28T22:08:55+5:302016-08-28T22:08:55+5:30
भारतीय संघाने रविवारी खेळल्या दुसऱ्या व अखेरच्या टी-२० लढतीत वेस्ट इंडिजचा डाव १९.४ षटकांत १४३ धावांत गुंडाळला.
ऑनलाइन लोकमत
फ्लोरिडा, दि. 28 - शनिवारी पहिल्या लढतीत एका धावेने पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय संघाने रविवारी खेळल्या दुसऱ्या व अखेरच्या टी-२० लढतीत वेस्ट इंडिजचा डाव १९.४ षटकांत १४३ धावांत गुंडाळला. भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करीत रविवारी विंडीजच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. विंडीजतर्फे जॉन्सन चार्ल्सने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. लेंडल सिमन्स (१९), किरोन पोलार्ड व आंद्रे रसेल (प्रत्येकी १३ धावा) आणि कार्लोस ब्रेथवेट (१८) यांनी दुहेरी धावसंख्या नोंदवली, पण त्यांना मोठी खेळी करता आली नाही.
धोनीने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. गोलंदाजांनी शनिवारी केलेल्या चुकांपासून बोध घेत आज अचूक मारा करीत विंडीजच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. भारताने आज स्टुअर्ट बिन्नीच्या स्थानी फिरकीपटू अमित मिश्राला संधी दिली तर विंडीजने शनिवारी खेळलेला संघच कायम राखला. मिश्राचा खेळविण्याचा निर्णय यशस्वी ठरला. त्याने २४ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. जसप्रित बुमराह (२-२६),रविचंद्रन अश्विन (२-११), शमी (२-३१) व भूवनेश्वर (१-३६) यांची त्याला योग्य साथ लाभली.