भारत ‘अ’चा शानदार विजय

By admin | Published: October 31, 2014 12:50 AM2014-10-31T00:50:49+5:302014-10-31T00:50:49+5:30

रोहित शर्मा आणि मनीष पांडे यांच्या शतकानंतर कर्ण शर्मा याने केलेल्या अचूक मा:याच्या बळावर भारत ‘अ’ संघाने गुरुवारी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सराव सामन्यात o्रीलंका संघावर शानदार विजय साजरा केला.

India A's magnificent victory | भारत ‘अ’चा शानदार विजय

भारत ‘अ’चा शानदार विजय

Next
रोहित नाईक  - मुंबई
रोहित शर्मा आणि मनीष पांडे यांच्या शतकानंतर कर्ण शर्मा याने केलेल्या अचूक मा:याच्या बळावर भारत ‘अ’ संघाने गुरुवारी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सराव सामन्यात o्रीलंका संघावर शानदार विजय साजरा केला. 382 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणा:या लंकेला निर्धारित 5क् षटकांत 9 बाद 294 धावांर्पयतच मजल मारण्यात यश आल्याने त्यांना 88 धावांनी पराभव पत्करावा लागला.
भारताच्या वन-डे संघात कमबॅक करण्यासाठी आतूर असलेल्या रोहितने घरच्या मैदानाचा पुरेपूर फायदा उचलत पाहुण्यांची धुलाई केली. त्याला मनीषनेही उत्तम साथ दिली. अपु:या तयारीने तडकाफडकी भारत दौ:यावर आलेल्या लंकन संघाने नाणोफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित आणि उन्मुक्त चंद यांनी सुरुवातीपासूनच लंकन गोलंदाजांवर प्रहार करण्यास सुरुवात केली. या दोघांची 96 धावांची भागीदारी लाहीरू गॅमेज याने तोडली. 62 चेंडूंत 54 धावा करणा:या चंदला त्याने संगकाराकरवी झेलबाद केले. मनिषने रोहितसह लंकन गोलंदाजांवर प्रहार केला. या दोघांनी दुस:या विकेटसाठी जवळपास आठच्या सरासरीने 214 धावांची भागीदारी करून संघाला 4क् षटकांच्या आत तीनशेचा पल्ला पार करून दिला. घरच्या मैदानाचा अंदाज असलेल्या रोहितने अगदी चतूर खेळ करून 111 चेंडूंत 18 चौकार व एका षटकारासह 142 धावा चोपल्या. 
अतिरिक्त धाव घेण्याच्या नादात रोहित धावबाद झाला आणि त्याचे दीडशतक अवघ्या 8 धावांनी हुकले. रोहितनंतर मैदानावर आलेल्या कर्णधार मनोज तिवारीनेही मनीषला उत्तम साथ देत अर्धशतकी भागीदारी केली. मनोजही 26 चेंडूंत 36 धावांचे योगदान देऊन माघारी परतला. मनीषने अखेर्पयत खिंड लढवून 113 चेंडूंत 15 चौकार व 1 षटकार खेचत नाबाद 135 धावा चोपत भारताला निर्धारित 5क् षटकांत 383 धावांचा पल्ला गाठून दिला. या लक्ष्याचा पाठलाग करताना लंकेची हवा पहिल्याच षटकात निघाली. मोहम्मद शमीच्या जागी संघात स्थान मिळवलेल्या मुंबईकर धवल कुलकर्णी याने पहिल्याच षटकात कुसल परेरा याला तंबूत पाठवले. उपुल थरंगा आणि तिलकरत्ने दिलशान यांनी सावध खेळावर भर दिला. (वृत्तसंस्था)
 
भारत ‘अ’ - रोहित शर्मा धावबाद (गॅमेज) 142, उन्मुक चंद झे. संगकारा गो. गॅमेज 54, मनीष पांडे नाबाद 135, मनोज तिवारी झे. प्रियांजन गो. प्रसाद 36, केदार जाधव झे. परेरा गो. प्रसाद क्, संजू सॅमसन झे. सिल्वा गो. प्रसाद 1, स्टुअर्ट बिन्नी झे. सिल्वा गो. गॅमेज 1. अवांतर - 13; एकूण - 6 बाद 382 धावा. गोलंदाजी - कुलशेकरा 6-क्-53-क्, प्रसाद 6-क्-57-3, मॅथ्युज 2-क्-22-क्, परेरा 6-क्-64-क्, प्रसन्ना 6-क्-27-क्, रंदीव 7-क्-51-क्, डी सिल्वा 6-क्-42-क्, दिलशान 3-क्-19-क्, प्रियांजन 1-क्-5-क्. 
o्रीलंका - कुसल परेरा झे. सॅमसन गो. कुलकर्णी 4, उपुल थरंगा झे. बिन्नी गो. कर्न 76, तिलकरत्ने दिलशान पायचीत गो. कर्न 14, कुमार संगकारा झे. बिन्नी गो. रसूल 34, माहेला जयवर्धने त्रि. गो. कर्न 33, अँजेलो मॅथ्यूज झे. नायर गो. कर्न 3, अशान प्रियांजन झे. कर्न गो. रसूल 23, निरोशान डिकवेल त्रि. गो. कुलकर्णी 29, थिसारा परेरा झे. रोहित गो. कुलदीप 21, सिक्कुगा प्रसन्ना नाबाद 21, चतुरंग डि सिल्वा नाबाद 26. अवांतर - 18; एकूण - 9 बाद 294 धावा. गोलंदाजी - धवल कुलकर्णी 7-क्-41-2, उन्मुक चंद 7-क्-4क्-क्, कर्न शर्मा 1क्-2-47-4, परवेज रसूल 1क्-क्-56-2, मनीष पांडे 2-क्-12-क्, कुलदीप यादव 1क्-क्-48-1, मनोज तिवारी 2-क्-23-क्.
 
रोहितने संधी साध्य केली - बांगर
रोहित शर्मा दर्जेदार खेळाडू असून, त्याने या सराव सामन्यातून स्वत:ची तंदुरुस्ती सिद्ध केली आहे. दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर त्याने मिळालेल्या संधीचा योग्य फायदा उचलला, असे संघाचा फलंदाजी प्रशिक्षण संजय बांगर यांनी सांगितले. या वेळी सामन्यात यशस्वी गोलंदाज ठरलेल्या कर्ण शर्माचीदेखील उपस्थिती होती. 

 

Web Title: India A's magnificent victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.