भारताला विजयासाठी ३७१ धावा आवश्यक

By admin | Published: August 20, 2015 11:32 PM2015-08-20T23:32:03+5:302015-08-20T23:32:03+5:30

दक्षिण आफ्रिका अ संघाने उभारलेल्या ५४२ धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारतीय अ संघाचा डाव २०४ धावांत गडगडला. आॅस्ट्रेलियाने दुसरा डाव १०५ धावांत घोषित

India need 371 runs to win | भारताला विजयासाठी ३७१ धावा आवश्यक

भारताला विजयासाठी ३७१ धावा आवश्यक

Next

वायनाड, केरळ : दक्षिण आफ्रिका अ संघाने उभारलेल्या ५४२ धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारतीय अ संघाचा डाव २०४ धावांत गडगडला. आॅस्ट्रेलियाने दुसरा डाव १०५ धावांत घोषित करीत भारतासमोर विजयासाठी ४४४ धावांचे लक्ष्य दिले होते. त्याचा पाठलाग करताना भारताची अवस्था २ बाद ७३ धावा झाली असून, अजूनही विजयासाठी ३७१ धावांची आवश्यकता आहे.
कृष्णागिरी मैदानावर हा चारदिवसीय अनौपचारिक कसोटी सामना सुरु आहे. दक्षिण आफ्रिका संघाने पहिल्या डावात उभारलेल्या ५४२ धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारताचा डाव तिसऱ्या दिवशी २०४ धावांत आटोपला. कालच्या १२२ धावांपासून सुरुवात केलेल्या भारताचे ७ फलंदाज ५३ धावांत बाद झाले. डेन पिट याने ५ गडी तंबूत धाडत भारताची फलंदाजी मोडून काढली.
त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावांत ३५ षटकांत १ गडी गमावून १०५ धावा करीत डाव घोषित केला. आर. हेंड्रीक्स याने ६१, तर एस. वान झिल याने ३८ धावा फटकावल्या.
विजयासाठी ४४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या दुसऱ्या डावात २९ षटकांत २ बाद ७३ धावा केल्या. खेळ संपला तेव्हा मुकुंद २७, तर अंबाती रायडू १३ धावांवर खेळत होता.
(वृत्तसंस्था)

Web Title: India need 371 runs to win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.