आशिया कप हॉकी स्पर्धेत भारत-पाक उपांत्य फेरीत
By Admin | Published: September 29, 2016 04:26 AM2016-09-29T04:26:38+5:302016-09-29T04:26:38+5:30
१८ वर्षांखालील आशिया चषक हॉकी स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे.
ढाका : १८ वर्षांखालील आशिया चषक हॉकी स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे.
दोन्ही संघांनी या स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. भारताने २००१ मध्ये विजेतेपद पटकावले होते; तर २००९ मध्ये भारताला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. पाकिस्तानने २००९ मध्ये जेतेपद, तर २०११ मध्ये कांस्यपदक पटकाविले होते.
पाकिस्तानने आपल्या गटात चिनी तैपैईला ६-१, तर चीनला ६-० असे पराभूत केले. हॉँगकॉँगला १४-० असे पराभूत करीत गटात अव्वल
स्थान पटकाविले. भारताला मात्र पहिल्याच सामन्यात बांगलादेशकडून ४-५ असे पराभूत व्हावे लागले.
हा सामना स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक रोमांचक सामना ठरला;
मात्र या पराभवातून
सावरत भारतीय संघाने ओमानला
११-० असे पराभूत करीत खाते
उघडले.
भारतीय आघाडीपटू इबुंगो सिंग व दिलप्रीत सिंग यांनी प्रत्येकी
चार गोल केले आहेत. कर्णधार निलाम संजीप जेस व गोलरक्षक पंकज कुमार यांनीही आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे.