पाकविरुद्ध हिशेब चुकता करण्यास भारत सज्ज

By admin | Published: June 1, 2017 11:30 PM2017-06-01T23:30:55+5:302017-06-01T23:30:55+5:30

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याची केवळ भारतातील नव्हे तर जगातील सर्व क्रिकेट चाहते वाट बघत असतात. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत या दोन्ही संघादरम्यान 4 जून रोजी सामना होत आहे.

India is ready to settle accounts with Pakistan | पाकविरुद्ध हिशेब चुकता करण्यास भारत सज्ज

पाकविरुद्ध हिशेब चुकता करण्यास भारत सज्ज

Next

नामदेव कुंभार, ऑनालाइन लोकमत
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याची केवळ भारतातील नव्हे तर जगातील सर्व क्रिकेट चाहते वाट बघत असतात. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत या दोन्ही संघादरम्यान 4 जून रोजी सामना होत आहे. या "हायव्होल्टेज" सामन्याची तयारी भारतीय चाहते सुद्धा करत आहेत. आयसीसीच्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने प्रत्येक वेळी पाकवर मात केली आहे. टी - 20 आणि विश्वचषकात भारताने पाकला 11 सामन्यात मात दिली आहे. मात्र, चॅम्पियन ट्रॉफीचा इतिहास थोडा वेगळा आहे. आतापर्यंत तीन लढती झाल्या असून, त्यापैकी दोन पाकने तर एक भारताने जिंकली आहे. त्यामुळे चार तारखेला बर्मिंगहॅम येथे रंगणाऱ्या हायव्होल्टेज लढतीमध्ये भारत पाकचा पराभव हिशेब चुकता करण्यास सज्ज असेल.
सातव्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 15 जून 2013 रोजी बर्मिंगहॅम येथे झालेल्या सामन्यात भारताने पाकचा पराभव केला होता. पावसाने व्यत्यय आणलेली ही लढत 40 षटकांची करण्यात आली. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या भारतीय संघाने पाकचा 39.4 षटकांत 165 धावांतच खुर्दा केला. त्यानंतर 22 षटकांत 102 धावांचे सुधारित टार्गेट देण्यात आले. शिखर धवन (48) आणि रोहित शर्मा (18) यांनी 10 षटकांत 58 धावांची सलामी दिल्यानंतर विराट (नाबाद 22) आणि दिनेश कार्तिक (नाबाद 11) यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. हा सामना भारताने आठ धावांनी जिंकला होता.
पाकिस्तानात सप्टेंबर 2008 मध्ये होणारी चँपियन्स ट्रॉफी सुरक्षेच्या कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे द. आफ्रिकेला यजमानपद मिळाले. 2009 मध्ये ही स्पर्धा प्रेक्षकांच्या चांगल्या उपस्थितीमुळे आणि काही चुरशीच्या लढतींमुळे गाजली. भारताने या स्पर्धेत निराशा केली. साखळीत तीनपैकी एकच लढत त्यांना जिंकता आली.
सेंच्युरियन येथे झालेल्या सामन्यात पाकने भारताचा पराभव केला होता. प्रथम फलंदाजी करणार्‍या पाकने शोएब मलिकच्या शतकाच्या (128) बळावर 302 धावा केल्या. भारताला 44 षटकांत 248 धावांत सर्वबाद करण्यात पाकला यश आले. राहुल द्रविड (76) आणि गौतम गंभीर (56) यांची अर्धशतके व्यर्थ ठरली.
19 सप्टेंबर 2004 रोजी बर्मिंगहॅम येथे झालेल्या सामन्यात भारताने निराशा केली. उपांत्य फेरी गाठणेही शक्य झाले नाही. पाकिस्तानविरुद्धचा पराभव भारताचे आव्हान साखळीत संपुष्टात येण्यास कारणीभूत ठरले. पाकविरोधात झालेल्या सामन्यात राहुल द्रविडच्या अर्धशतकामुळे (67) भारताने 200 धावा केल्या. पाकने हे आव्हान 49.2 षटकांत 7 विकेट गमावून पूर्ण केले. कर्णधार सौरव गांगुली आणि युवराजसिंगला या लढतीत भोपळाही फोडता आला नव्हता.
पांरपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकचा पराभव करण्यासाठी भारत प्रयत्न करणार यात काही दुमत नाही. यापूर्वी भारताची दुबळी बाजू समजली जाणारी गोलंदाजी या स्पर्धेत भारताला विजय मिळून देण्यास सज्ज आहे. बुमराह, शमी, भुवनेश्वर आणि उमेश यादव या चौकटीला अश्विन, जाडेजा आणि हार्दिकची साथ असेल. चॅम्पियन ट्रॉफीचे इंग्लंडकडे यजमानपद असताना भारत-पाकच्या दोन्ही लढती बर्मिंगहॅम येथे झाल्या आहेत. यामध्ये भारत-पाकने प्रत्येकी एक वेळा विजय मिळवला आहे, यावर्षीही त्याच ठिकाणी लढत रंगणार आहे.
माजी कर्णधार एम.एस धोनीने पाकविरुद्ध 58.38 च्या सरासरीने धावा ठोकल्या असून यात दोन शतके आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. धोनी आणि विराट कोहलीची वन-डेतील सर्वोच्च 183 धावसंख्या पाकविरुद्धच आहे. फलंदाजीत भारताकडे रोहित शर्मा, धवन, कोहली, युवराज, धोनी सारखे तगडे खेळाडू आहेत. हार्दिक पांड्या आणि केदार जाधव भारताकडून छुप्या रुस्तम प्रमाणे चमकू शकतात. त्यांची कामगिरी भारताला हिशेब चुकता करण्यास मोलाची ठरू शकते.

Web Title: India is ready to settle accounts with Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.